मुंबई, 30 जुलै : ज्या लोकांच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीत असतो, त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक विविध उपाय करतात. हिंदू धर्मानुसार शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया.
शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय -
हनुमानाची पूजा -
शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर सूर्यास्तानंतर शनिवारी हनुमानाची पूजा करा. हनुमानजींच्या पूजेमध्ये सिंदूर ठेवला जातो आणि आरतीसाठी काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. पूजेत निळे फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.
शनि यंत्राची स्थापना करा -
शनिदेवाच्या प्रकोपामुळे जीवन संकटांनी घेरले असेल तर शनिवारी शनियंत्राची स्थापना करून पूजा करावी. या यंत्राची दररोज पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. शनियंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून निळी फुले रोज अर्पण केल्याने शनिदेवाची कृपा कायम राहते.
काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य -
पूजेच्या एक दिवस आधी तीन भांड्यांमध्ये 1.25 किलो काळे हरभरे वेगळे भिजवा. दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर ते काळे हरभरे विधिनुसार शनिदेवाच्या पूजेत अर्पण करावेत. पूजेनंतर प्रथम काही हरभरे म्हशीला खायला द्यावेत. उर्वरित कुष्ठरुग्णांना वाटण्यात यावे. त्याचबरोबर काही हरभरे घरापासून दूर अशा ठिकाणी ठेवावे जेथे कोणी जात नसतं.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
काळ्या गायीची सेवा -
शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे गायीची सेवा करणे. काळ्या गाईची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. गायीच्या शिंगावर कलावा बांधून पूजा करावी. यानंतर गायीभोवती फिरून तिला चार चमचे बुंदी खाऊ घाला.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.