मुंबई , 26 नोव्हेंबर : सध्याच्या काळात सर्वच लोक आपल्या फायद्याचा विचार करतात. परंतु काही लोक आजही खूप साधे सरळ असतात. मनाने विचार करणारे असतात. त्याच सोबत खूप लाजाळू देखील असतात. मूल्यांक 7 चे जातकाही असेच असतात. जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज ७ येत असेल, म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ या तारखेला झालेला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. मूल्यांक : समजा जातकाचा जन्मदिनांक हा 16 मे 1991 आहे, तर 16 या दिवसाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय. जोडीदारावर भरभरून प्रेम करतात या महिला; ही जन्मतारीख असेल तर तिच्याशी बिनधास्त लग्न करा 7 हा मूल्यांक 16 = 1+6 =7 = मूल्यांक. 7 या अंकाचा ग्रह केतू आहे . जाणून घेऊयात 7 मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये: 7 मूल्यांकच्या लोकांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या कटकटी आवडत नाही. हे जातक मनाने विचार करणारे असतात. खूप सरळ साधं राहणीमान ते पसंत करतात. धार्मिक खूप असतात. त्यांना कोणाचे वाईट पहावत नाही. स्वताहून समोरच्याला मदत करतात. शांत स्वभावाचे असतात. स्वाभिमानी असतात. मनातून दुखी असले तरी वर वर चेहरा हसरा ठेवणारे असतात. यांच्या मनात काय चाललंय हे कोणीच ओळखू शकत नाही. पण हे मात्र समोरच्याच्या मनातील सर्व काही ओळखतात. लाजाळू वृत्तीचे असतात. हे लोक कल्पना शक्तीचे धनी असतात. सात्विक विचारांचे असतात. 7 मूल्यांकचे लोक संगीत क्षेत्रात , चित्रकार , संशोधन क्षेत्रात, इन्जिनिअर, सॉफ्टवेअर, लेखक, ज्योतिषी या क्षेत्रात विशेष प्रगती पथावर असतात. या जातकांनी सफेद रंगाचे वस्त्र वापरणे लाभ कारक ठरेल . 7 मूल्यांकाचा शुभ अंक - 4 ,6 ,5 ,1 अशुभ अंक - कोणताही नाही शुभ वार -रविवार ,सोमवार अशुभ वार -मंगळवार शुभ रंग - सफेद ,लाल,हिरवा अशुभ रंग - कोणताही नाही विकार – कावीळ ,दंत रोग , संधीवात,सर्दी ,डोळ्यांचे विकार लाभकारी रत्ना - मोती उपासना – पिंपळची पूजा ,केतू मंत्र जप, मूल्यांक 7 चे प्रसिद्ध व्यक्ति - महेंद्र सिंग धोनी ,कतरिना कैफ ,करण जोहर, अरविंद केजरीवर , हेमा मालिनी. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







