मुंबई, 6 डिसेंबर : ज्योतिषांच्या मते कोणत्याही व्यक्तीच्या राशी आणि कुंडलीनुसार त्याचे गुण, अवगुण आणि करिअरबद्दल माहिती मिळवता येते. लग्नाबाबत प्रत्येक मुलीचे वेगळे स्वप्न असते. प्रत्येक मुलीला खूप प्रेमळ सासर आणि नवरा मिळावा अशी इच्छा असते. हिंदू धर्मात असे मानले जाते की जेव्हा एखादी मुलगी लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी येते तेव्हा ती लक्ष्मीच्या रूपाने तिच्यासोबत सुख आणि समृद्धी घेऊन येत असते.
ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आणि 9 ग्रह सांगितले आहेत. प्रत्येक राशीचा स्वतःचा शासक ग्रह असतो आणि ग्रह व्यक्तीच्या स्वभावावर प्रभाव टाकतात. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा 4 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये जन्मलेल्या मुलींना सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानले जाते. त्यांनी घरात पाऊल ठेवल्याने सासरच्या घरात पैसा आणि धान्याची कमतरता भासत नाही. ज्योतिषी या राशीच्या मुलींना लक्ष्मीचे रूप मानतात.
कर्क : या राशीच्या मुली सासरच्या घरी लक्ष्मीच्या रूपात येतात. त्या अतिशय दयाळू स्वभावाच्या असतात. त्यांच्या घरात प्रवेश केल्याने दु:ख आणि त्रास दूर होतात. या राशीच्या मुली आपल्या पतींसाठी खूप भाग्यवान ठरतात. त्या आपल्या पतीला प्रत्येक परिस्थितीत साथ देतात.
तूळ राशी : ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या मुली ज्या कोणाशी लग्न करतात त्यांचे भाग्य पूर्णपणे बदलते. त्या नात्याला खूप महत्त्व देतात. या राशीच्या मुलींना प्रत्येक परिस्थितीला कसे तोंड द्यायचे हे चांगले कळते.
कुंभ : या राशीच्या मुली त्यांच्या पतींसाठी खूप भाग्यशाली मानल्या जातात. या राशीच्या मुलींना सासरच्या लोकांकडून खूप प्रेम मिळते. त्या आपल्या पतीच्या जीवनात लक्ष्मीच्या रूपात प्रवेश करतात. लग्नानंतर पतीचे नशीब उघडते.
मीन : मीन राशीच्या मुली आपल्या पतींप्रति खूप प्रामाणिक आणि खूप निष्ठावान असतात. त्या आपल्या पतीची खूप काळजी घेतात. या राशीच्या मुली ज्या व्यक्तीसोबत लग्न करतात, त्यांचे करिअर शिखरावर पोहोचते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.