मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राज्य सरकारचा पुणे भाजपला दणका, अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचा प्लॅन यशस्वी!

राज्य सरकारचा पुणे भाजपला दणका, अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचा प्लॅन यशस्वी!

 या 23 गावांचा विकास आराखडा गेले चार दिवस पुणे महापालिकेचा राजकीय आखाडा चांगलाच तापला होता.

या 23 गावांचा विकास आराखडा गेले चार दिवस पुणे महापालिकेचा राजकीय आखाडा चांगलाच तापला होता.

या 23 गावांचा विकास आराखडा गेले चार दिवस पुणे महापालिकेचा राजकीय आखाडा चांगलाच तापला होता.

पुणे, 15 जुलै : पुणे महापालिकेत (pune municipal corporation) नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्यावरून सुरू झालेला वाद राज्य सरकारने (mva government) एका झटक्यात संपवला आहे. पुणे महापालिकेत 23 गावे समाविष्ट होण्यापूर्वी या गावांचा विकास आराखडा अखेर पीएमआरडीएच करणार आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपला (bjp) राज्य सरकारनं मोठा झटका दिल्याचं मानलं जातं आहे.

या गावाचा आराखडा बनविण्याची जबाबदारी पुणे महानगर प्राधिकरणाकडे देण्यात आली होती. मात्र महापालिकेत वर्ग झाल्यानंतर या गावांचा विकास आराखडा करण्याची जबाबदारीही पुणे महापालिकेला मिळावी असा आग्रह सत्ताधारी भाजपचा होता. त्यासाठी तातडीने गुरुवारी खास सभेचे आयोजन करण्यात आले होतं. मात्र महापालिकेतल्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी काल रात्री अत्यंत वेगवान हालचाली केल्या.

मोठी बातमी, करीना कपूरविरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

राष्ट्रवादीच्या शहरातल्या नेत्यांनी थेट अजित पवार यांना संपर्क करून तातडीने मध्यस्थी करायची विनंती केली तर शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून भाजपची भूमिका त्यांच्या कानावर घातली. यानंतर नगरविकास विभागात तातडीने हालचाली होऊन या संदर्भातले आदेश तयार करण्यात आले आणि कॅबिनेटच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे नेले आणि तिथे या आदेशावर सही झाल्यानंतर काही वेळातच ही बातमी महापालिका वर्तुळात पसरली.

त्यामुळे भाजपने गुरुवारी घेतलेल्या खास सभेला कुठलाच अर्थ राहिलेला नाही. आदेशानुसार, नगरविकास विभागाने या संदर्भातले सगळे अधिकार हे पुणे महानगर प्राधिकरणाकडे राहतील, असे आदेश करत गुरुवारी महापालिकेची होणारी मुख्य सभा निरस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपला राज्य सरकारनं मोठा झटका दिल्याचं मानलं जातं आहे.

टेनिसपटू लिएंडर पेस या अभिनेत्रीला करतोय डेट! गोव्यातले PHOTO VIRAL

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला या विकास आराखड्यातून आर्थिक उलाढाल करावयाची असल्याने त्यांनी इतक्या उठाठेवी करून खास सभेचं आयोजन केल्याचा एकत्रित पत्रकार परिषद घेऊन केलाय आरोप केलाय.. भाजपने मात्र तेवीस गावांचा विकासाची जबाबदारी महापालिकेवर असल्याने नियोजनाची ही जबाबदारी महापालिकेकडे असावी अशी भूमिका घेतली आहे मात्र राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने त्याला आमचा विरोध नाही, असे स्पष्ट केलंय. एक नक्की या 23 गावांचा विकास आराखडा गेले चार दिवस पुणे महापालिकेचा राजकीय आखाडा चांगलाच तापला होता.

First published:

Tags: Ajit pawar, BJP, Eknath Shinde, Pune, Pune municipal corporation, Pune news, Shivsena, पुणे