बीड, 14 जुलै : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. करीनाने ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्रा बायबलचे नाव 'प्रेग्नसी बायबल' (kareena kapoor pregnancy bible) या पुस्तकावर वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूरने नुकतेच 'प्रेग्नसी बायबल' या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकावर बायबल या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. बायबल शब्द वापरण्यात आल्यामुळे बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने आक्षेप घेतला आहे.
सुवर्णसंधी! बुलढाणा डाक विभागात 'या' पदासाठी जागा रिक्त; आता लगेचच पाठवा अर्ज
करीना कपूरने आपल्या पुस्तकावर बायबल शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे.
याबद्दल बीडच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. करीना कपूरविरोधात तक्रार दाखल झाल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सुंदर पिचईंचं गली क्रिकेट, गुगलीवर Google च्या सीईओंची बॅटिंग!
या तक्रारीबद्दल अद्याप करीना कपूर आणि पुस्तक प्रकाशकांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही ख्रिश्चन महासंघाकडून करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.