संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे डान्सर गौतमी पाटील.
आपल्या डान्सनं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अन् खेड्यापाड्यात क्रेझ आहे.
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आणि त्यानंतर गौतमी पाटील हे नाव कायमच चर्चेत राहिलं.
गौतमीवर झालेल्या आरोपानंतर तिनं तिच्या डान्समध्ये आणि स्वत:मध्ये बरेच बदल केले. तिच्यावर कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र दिवसेंदिवस गौतमीची क्रेझ वाढतच असल्याचं चित्र दिसतंय.
नेत्याच्या कार्यक्रमांपासून ते चिमुरड्यांच्या बर्थ डे पार्ट्यांसाठी गौतमीला आमंत्रणं येऊ लागली आहे. गौतमीच्या एका महिन्यातील सगळ्या तारख्या फुल्ल होऊ लागल्या आहेत. कार्यक्रमांच्या घेऊ तितक्या सुपाऱ्या कमी आहे, अशी अवस्था गौतमीची झाली आहे.
इतकी टीका होऊन, आरोप होऊनही त्याच दमात कार्यक्रम करणारी गौतमी एका सुपारीचे ( कार्यक्रमाचे) किती पैसे घेत असेल याचा विचार तुम्ही कधी केलाय का?
न्यूज 18लोकमतच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते.