मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बड्डे लेकाचा अन् हवा केली बापाने, थेट गौतमीला बोलावलं, पोरगंही म्हणालं, सबसे कातील...VIDEO

बड्डे लेकाचा अन् हवा केली बापाने, थेट गौतमीला बोलावलं, पोरगंही म्हणालं, सबसे कातील...VIDEO

साताऱ्यातील खोजेवाडी येथे पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवस होता.

साताऱ्यातील खोजेवाडी येथे पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवस होता.

साताऱ्यातील खोजेवाडी येथे पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवस होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सचिन जाधव, प्रतिनिधी

सातारा, 25 फेब्रुवारी : पश्चिम महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटील नावाची सुनामी आली आहे. राजकीय कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा कुठल्या नेत्याचा कार्यक्रम असेल तर गौतमी पाटील पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं समिकरणच झालं आहे. आता तर एका 5 वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाचा गौतमीला बोलावलं होतं.

साताऱ्यातील खोजेवाडी येथे पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवस होता. मग काय मल्हार सेठचा वाढदिवस असल्यामुळे वडिलांनी लेकाचा वाढदिवस जरा हटके करण्याचं ठरवलं. मग काय गौतमी पाटील हिलाच बोलावण्यात आलं.

आता गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार म्हटल्यावर पोरांनी एकच गर्दी केली. तिच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील गौतमी पाटीलचे चाहते उपस्थित राहिले होते. गौतमी पाटीलनेही मल्हारसोबत केक कापला आणि त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी सबसे कातील, गौतमी पाटील...असं डॉयलॉगच मल्हारने म्हणून दाखवला. मल्हारचा डॉयलॉग ऐकून गौतमीही भारावून गेली.

(भाजप नेत्याच्या वाढदिवशी गौतमी पाटीलचा खान्देश कन्या म्हणून गौरव, पाहा PHOTOS)

यावेळी विशेष म्हणजे, या कार्यक्रमास महिलांची मोठी लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र या झालेल्या कार्यक्रमात मुलाच्या वाढदिवसाला वडिलांची हवा अशी चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे.

(गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि चाहत्यांचा राडा समीकरण बनलंय का? नगरमध्ये गोंधळ)

दरम्यान, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गौतमीचा  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राडा झाला आहे. कार्यक्रम सुरू असताना काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला, त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. या प्रकारानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Gautami Patil