सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांनाही आपले कला-गुण सर्वांसमोर सादर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय. सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतात, सर्वत्र त्यांची चर्चा होते आणि ते लोकप्रियही होतात. लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढते. महाराष्ट्रातही सोशल मीडियामुळे चर्चेत आलेलं असंच एक नाव म्हणजे गौतमी पाटील.