सातारा, 31 ऑक्टोबर : सोशल मीडियावर अनेक जण प्रसिद्धीसाठी काही हटके व्हिडीओ तयार करत असतात. यात काही व्हिडिओ सुंदर असतात तर काही व्हिडिओमुळे अनेकजण वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आपल्या आदाकारीने सोशल मिडियावर गौतमी पाटील देखील चांगलीच व्हायरल झाली. गौतमीच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. मात्र, गौतमीबद्दलची खासगी माहिती अनेकांना माहिती नाही. News18 लोकलशी बोलताना गोतमीने तीच्या डान्स, शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे.
गौतमी पाटील ही एक डान्सर आहे आणि तिला लावणी डान्सर म्हणून ओळखलं जातं. अनेक कार्यक्रमात गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं देखील जातं आणि त्यासाठी तिला मानधन देखील दिलं जातं. गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ Youtube, instagram, facebook वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गौतमीच्या व्हिडीओची चर्चा होते. मात्र, काही व्हिडिओमधील डान्स स्टेप्समुळं गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
डान्स आणि कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत
सोशल मीडियाने गौतमी पाटीला प्रसिद्धी मिळवून दिली. आपला डान्स आणि एक्प्रेशनने अनेक तरुणांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली ती तिच्या डान्स आणि कॉन्ट्रोवर्सीमुळे. खरंतर सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने असे काही डान्स स्टेप्स केले आहेत की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. ज्यानंतर गौतमीने लोकांची माफी देखील मागीतली.
कोण आहे गौतमी पाटील, जिचा डान्स ठरतोय चर्चेचा विषय? Photo Viral
सप्टेंबर 2022 मध्ये गौतमी पाटीलने एका शोमध्ये आक्षेपार्ह स्टेप डान्स करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. गौतमी पाटीलच्या डान्स मूव्हमुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आणि प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचा व्हिडीओ व्हायरल होत गेले. यानंतर अनेक लोक तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.
शिक्षण, वय, गाव
इतकी प्रसिद्धी मिळून देखील गौतमी संदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना माहिती नाहीत. त्या बद्दल स्वतः गौतमी पाटीलने News18 लोकलला माहिती दिली आहे. गौतमीनं सांगितले की, मी मुळची धुळे जिल्ह्यातील आहे. माझं वय 26 आहे. शिक्षण केवळ दहावी झालं आहे. धुळ्यातील सिंदखेडा या ठिकाणीच दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. गेली नऊ ते दहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे. डान्ससाठी कुठे प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. इतरांचे पाहून मी डान्स करायला शिकले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautami Patil, Satara, Satara news, Social media, Viral, Viral news