मुंबई, 24 जानेवारी: टिक टॉक स्टार आणि लावणी क्वीन म्हणून गौतमी पाटील ओळखली जाते. मागच्या वर्षभरात गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ होतो. ती कायमच चर्चेत असते. गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. गौतमीच्या लावणीवरून निर्माण झालेला वाद आजही सुरू आहे. असं असलं तरी तिच्या कार्यक्रमांची गर्दी काही कमी होत नाही. अशातच आता तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गौतमी पाटील ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर टीका करण्यात आली. गौतमी पाटीलच्या लावणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवार कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. आता गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा कोर्टाने दिले आहेत. हेही वाचा - सोशल मीडियावर व्हायरल झालेली डान्सर गौतमी पाटील कोण आहे? पाहा Inside Story गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांनी हैदोस घातला. त्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती. गौतमी पाटीलच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे.छोट्या गावातही गौतमी पाटीलच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमाला येतात. तरुण बेभान होऊन नाचतात. गौतमीच्या कार्यक्रमात नेहमी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी पोलीस देखील बोलवावे लागतात.
गौतमी पाटीलच्या पुढच्या 2 महिन्यांचे कार्यक्रम फिक्स असतात. गौतमी आपल्या कार्यक्रमात अश्लिल हावभाव करते, लोकांना घाणारडे हातवारे करते, शॉर्ट कपडे घालते हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत. लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी. तिने लावणीच करावी अश्लीलपणा करू नये असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती. आता तिच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.