भाजपने आणलेला सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभेत फेटाळला

भाजपने आणलेला सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभेत फेटाळला

विधानसभेत एकीकडे मोठ्याने घोषणाबाजी सुरू आहे तर दुसरीकडे सभागृहाचं कामकाज सुरू असल्याचं दिसत आहे. पण यावर घोषणाबाजी करून कामकाज रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकर गौरव प्रस्ताव फेटाळला आहे. यावरून विधासभेत एकच गदारोळ सुरू झाला आहे. भाजपा आमदारांनी सभागृहामध्ये मोठ्याने घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे. सावरकर गौरव प्रस्ताव हा नियमांत बसत नाही असं सांगत नाना पटोलेंनी प्रस्ताव फेटाळला आहे. अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळताच सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली.

विधानसभेत एकीकडे मोठ्याने घोषणाबाजी सुरू आहे तर दुसरीकडे सभागृहाचं कामकाज सुरू असल्याचं दिसत आहे. पण यावर घोषणाबाजी करून कामकाज रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. सावरकरांना गौरव पुरस्कार द्या आणि त्यानंतर गौरव प्रस्ताव मांडा असं अनिल परब म्हणाले आहेत तर सावरकर महाराष्ट्राची आन-बान-शान अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या आहे.

सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक

सावरकरांचं काम खूप मोठं आहे. त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये फडणवीसांनी भारतरत्न का दिला नाही? असा सवाल यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला. यावर फडणवीसांनी अतिशय आक्रमक प्रतिक्रिया देत 'शिदोरी' मासिकावर बंदी घालावी अशी मागणी फडणवीसांनी केली  आहे.

इतर बातम्या - लग्नाच्या आनंदात पसरली शोककळा, भीषण अपघातामध्ये 18 वऱ्हाड्यांचा मृत्यू

खरंतर आज (26 फेब्रुवारी )सावरकारांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त भाजपने विधिमंडळाच्या परिसरात सावकरांची प्रतिमा लावून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी त्यांना सावरकरांना अभिवादन करण्याची विनंती केली. त्यानंतर थोरातांनीही सावरकरांना पुष्पांजली अर्पण केली. त्यामुळे राजकीय वातावरणात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. तर महापुरुषांचं योगदान नाकारून चालणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

अजित पवार म्हणाले होते की, महापुरुषांच्या कामावरून वाद होऊ नये. सावरकरांचं अनेक क्षेत्रातलं योगदान हे नाकारून चालणार नाही. उगाच त्यावरून वाद निर्माण करू नये. असा वाद निर्माण करून समाजात गैरसमज पसरविण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला होता.

इतर बातम्या - 17 दिवसांत लागणार होती हळद, असं काय झालं की MD डॉक्टर तरुणीने घेतला गळफास?

सावरकरांच्या गौरवाच्या मुद्यावर प्रस्ताव आणण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे या विषयावरून महाआघाडीत मतभेद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेनेने आत्तापर्यंत या प्रकरणावरुन तरी फारशी दाद भाजपला दिली नाही. सावरकर हा शिवसेनेच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. खासदार संजय राऊत यांनी यावरून राहुल गांधी यांच्यावर टीकाही केली होती.

इतर बातम्या - बंदूकीच्या समोर उभ्या असलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याला सलाम, म्हणाले...

First published: February 26, 2020, 1:17 PM IST

ताज्या बातम्या