Home /News /maharashtra /

पुढच्या 17 दिवसांत लागणार होती हळद, असं काय झालं की MD डॉक्टर तरुणीने घेतला गळफास?

पुढच्या 17 दिवसांत लागणार होती हळद, असं काय झालं की MD डॉक्टर तरुणीने घेतला गळफास?

येत्या 13 मार्च रोजी शादाबचे लग्न होतं. पण त्याआधीच तिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद, 26 फेब्रुवारी : औरंगाबादमधून महिला आत्महत्येची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 28 वर्षीय एम.डी. असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. तरुण वयात अशा प्रकारे आयुष्य संपवल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. डॉ. शादाब शिरीन मोहम्मद आरिफ असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. औरंगाबादमधील कटकट गेट भागात राहत्या घरी तरुणीने आत्महत्या केली आहे. शादाब ही शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत होती. घरातल्या खिडकीला गळफास घेऊन शादाबने आत्महत्या केली आहे. तिच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 13 मार्च रोजी शादाबचे लग्न होतं. पण त्याआधीच तिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रात्री 10च्या सुमारास पोलिसांना डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणी डॉक्टरचा मृतदेह हा खिडकीला लटकलेल्या अवस्थेत होता. इतर बातम्या - अजित पवार म्हणतात, सावकरांचं योगदान नाकारू नका; तर काँग्रेस मंत्र्यांचं अभिवादन पोलिसांनी घराचा तपास घेत शादाबचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांवर लग्न ठरलं असताना तरुणीने गळफास घेत टोकाचं पाऊल का उचललं याचं अद्याप नेमकं कारण समोर आलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घराची झडती घेतली असता कोणतीही सुसाईड नोट किंवा इतर संशयास्पद वस्तू हाती लागली नाही. तरुणी डॉक्टरच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलीस आता कुटुंबीय आणि शेजारील लोकांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, ज्या तरुणाशी शादाबचा विवाह ठरला होता त्याची आणि त्याच्या कुटुंबियांचीदेखील या प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. इतर बातम्या - बंदूकीच्या समोर उभ्या असलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याला सलाम, म्हणाले
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Aaurangabad

पुढील बातम्या