जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / बंदूकीच्या समोर उभ्या असलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याला सलाम, म्हणाले...

बंदूकीच्या समोर उभ्या असलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याला सलाम, म्हणाले...

बंदूकीच्या समोर उभ्या असलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याला सलाम, म्हणाले...

सोनीपत येथे राहणारे दीपक दहिया 2010 मध्ये हवालदार पदावर दाखल झाले होते. ते सध्या तिसऱ्या बटालियनमध्ये तैनात आहेत आणि बाजीराबाद पीटीएसमध्ये हेड कॉन्स्टेबलचे प्रशिक्षण घेत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीतील हिंसाचारात मौजपुरातील एका बंदूक पकडलेल्या शाहरुख नावाच्या युवकासमोर समोर उभे असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोलिस कर्मचाऱ्याच्या शौर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा निर्भय पोलीस हवालदार दीपक दहिया आहेत. ‘मी जर घाबरलो असतो तर बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला असता. म्हणून ते काठीच्या मदतीने तरूणाला सामोरे गेलो’ अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. सोनीपत येथे राहणारे दीपक दहिया 2010 मध्ये हवालदार पदावर दाखल झाले होते. ते सध्या तिसऱ्या बटालियनमध्ये तैनात आहेत आणि बाजीराबाद पीटीएसमध्ये हेड कॉन्स्टेबलचे प्रशिक्षण घेत आहेत. दीपक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मौजपूर वैष्णो देवी मंदिराजवळ तैनात होते. ते आपल्या टीमसह मेट्रो लाईनभोवती उभे असलेल्या लोकांना पांगवत होते. तेव्हा हातात एक बंदूक घेऊन फायर करताना समोरून शाहरुख नावाचा एक तरुण पुढे गेला. दीपक यांचं म्हणणं होतं की जर तरुण पुढे गेला असता तर बर्‍याच लोकांना आपला जीव गमवावा लागला असता. म्हणून ते काठीने त्या युवकास सामोरे गेले. तरूणानेही दीपक यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ओरडत राहिले आणि तो मागे गेला.

जाहिरात

गोळी मारण्याची दिली होती धमकी या युवकाने दीपक यांना समोर जाऊ न दिल्यास गोळी घालण्याची धमकीही दिली, पण त्यांनी न घाबरता त्याला ओरडून परत जाण्यास सांगितले. दरम्यान, लोक त्या तरुणला मागून गोळीबार करण्यासाठी चिथावणी देत होते. त्यानंतर इतर पोलिसांनी गर्दी पलीकडे पसार केली. पोलिसांवर बंदूक रोखणाऱ्या शाहरुखला अटक दुसरीकडे अप्पर पोलीस आयुक्त मनदीपसिंग रंधावा म्हणाले की, घटनेत सामील असलेल्या शाहरुखला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुध्द शस्त्रास्त्र कायद्यान्वये आणि सरकारी कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात