जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / लग्नाच्या आनंदात पसरली शोककळा, भीषण अपघातामध्ये 18 वऱ्हाड्यांचा मृत्यू

लग्नाच्या आनंदात पसरली शोककळा, भीषण अपघातामध्ये 18 वऱ्हाड्यांचा मृत्यू

लग्नाच्या आनंदात पसरली शोककळा, भीषण अपघातामध्ये 18 वऱ्हाड्यांचा मृत्यू

कोप-लालसोट मेगा महामार्गावर पापरी गावाजवळ बसवरील नियंत्रण हुकल्यामुळे बस नदीत कोसळली(bus falls into river).

  • -MIN READ
  • Last Updated :

बूंदी, 26 फेब्रुवारी : राजस्थानातील बुंदी (bundi) जिल्ह्यात बुधवारी पहाटे एक मोठा रस्ता अपघात झाला. पापाडी गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस मेज नदीत कोसळली. लेकेरी पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या या घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर डझनभरहून अधिक लोकांना नदीतून वाचविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात बचावकार्य घटनास्थळी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोटाच्या दाडीबारी येथील एका कुटुंबातील सदस्य सवाई माधोपूर इथे लग्न समारंभासाठी जात होते आणि ही घटना वाटेतच घडली. कोप-लालसोट मेगा महामार्गावर पापरी गावाजवळ बसवरील नियंत्रण हुकल्यामुळे बस नदीत कोसळली(bus falls into river).  पुढचा टायर थोडा बाहेर आल्यामुळे बस अनियंत्रित झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

NDRF ची टीम घटनास्थळी दाखल बुंदीचे जिल्हाधिकारी अंतरसिंह नेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाई माधोपूरकडे जात असताना हा अपघात झाला. बस नदीत कोसळताच जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. एनडीआरएफच्या टीमकडून बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत 12-13 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बसमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मुरारीचे कुटुंब मायराला भाच्याच्या लग्नासाठी निघाले होते मिळालेल्या माहितीनुसार, कोटा येथील मुरारीलाल धोबी आपल्या कुटूंबासह सवाई माधोपूरला जात होते. तिथे त्यांच्या भाच्याचा लग्न सोहळा पार पडणार होता. दरम्यान, वाटेत हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक लोकांची गर्दी जमली होती. स्थानिक लोकांकडूनही एनडीआरएफ टीमच्या सदस्यांना मदत आणि मदतकार्य सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात