मुंबई, 06 जुलै : राज्यात कोरोनाच्या संकटात सत्ताधारी पक्षावरदेखील संकट आल्याचं चित्र आहे. एकीकडे शरद पवार आणि काँग्रेसचे काही नेते हे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकजे अजित पवारांच्या एका खेळीमुळे उद्धव ठाकरे हे त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या दिवसांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर महत्त्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर दाखल झाले असून त्यांच्याच महत्त्वाची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीदेखील मातोश्रीवर चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना निरोप गेला होता. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोनकरून अजित दादांना निरोप दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनलॉकसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, या व्यवसायासाठी दिली परवानगी खरंतर, पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश मख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फार रुचलेलं दिसत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित दादांना दिल्याचं कळतं आहे. लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा धक्का, या मोठ्या कंपनीने जाहीर केली 50 टक्के वेतन कपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढंच नाहीतर राज्यात जुलै महिन्यापर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा झाल्यानंतर मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा देण्यात यावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं होतं. पण यावर नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने ही अट मागे घेतली. लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल दरम्यान, महाविकास आघाडीचे शरद पवार हे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने ठाकरेंपुढे नाराजी उघड केली जाण्यार आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या अर्थविकासाच्या दृष्टीने व्यवहार खुले करण्याच्या विचारात होते. पण उद्धव ठाकरे सरकारने मात्र त्यांना विश्वासात न घेताच लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये काय होतं हे पाहावं लागणार आहे. संकलन आणि संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.