औरंगाबाद, 06 जुलै : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आलं आहे. अशात औरंगाबादमध्येही 10 ते 18 जुलै दरम्यान लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान, बजाज ऑटोने कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वाळूज प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 50 टक्के कपात करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
A lockdown has been in imposed in Aurangabad from July 10 to 18. Bajaj Auto says the said lockdown will lead to 50% cut in wages (Waluj plant) pic.twitter.com/leT8ehfbt8
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) July 6, 2020
लॉकडाऊनमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत उत्पादनात झालेलं नुकसान भरून काढण्यात येईल. यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरात आजपासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबाद महानगर पालिकेचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरात यासंबंधी माहिती दिली आहे. शहरात वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर म्हटलं होतं. जर शहर वाचवायचं असेल तर नागरिकांनी संचारबंदीच्या कडक पालन केलं पाहिजं. नागरिकांनी ही संचारबंदी प्रशासनाची नाही तर स्वतःने स्वतःला लावलेली संचारबंदी समजावी’ असं आवाहनही केंद्रेकर यांनी केलं होतं. औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण रेल्वे स्टेशन परिसर (3), अरिहंत नगर (1), पद्मपुरा (1), अविष्कार कॉलनी, एन सहा (1), वसंत विहार, देवळाई रोड, बीड बायपास (1), हनुमान नगर (1), अल्पाइन हॉस्पीटल परिसर (1), गारखेडा (2), मथुरा नगर (1), विष्णू नगर (1), चिकलठाणा (1), नुपूर सिनेमा परिसर, सिडको (2), मयूर पार्क (5), एन दोन सिडको (4), हर्सूल, पिसादेवी (1), दशमेश नगर (1), वेदांत नगर (1), जय भवानी नगर (2), प्राइड रेसिडन्सी (1), टीव्ही सेंटर (1), शास्त्री नगर (2), अशोक नगर, सिंधी बन (1) ग्रामीण भागातील रुग्ण आयोध्या नगर, बजाज नगर (1), क्रांती नगर, बजाज नगर (2), अंधानेर, कन्नड (1), रांजणगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. संपादन - रेणुका धायबर