मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल

लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल

हवामानातील सततच्या बदलामुळे, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी, वादळासारख्या संकटामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

उस्मानाबाद, 07 जुलै : राज्यात कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाले. त्यात शेतकऱ्यावर आसमानी संकट आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी, वादळासारख्या संकटामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

सोयाबीन न उगवल्याने आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातील बहुला गावातली ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने लॅपटॉप मागितला. पण शेतात काहीही पिकलं नसल्यामुळे मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा बळीराजाकडे पैसे नव्हते. त्यामुळे आपण हारलो या भावनेनं शेतकऱ्याने आत्महत्या केली.

खरंतर, यंदा सोयाबीन पिकलंच नाही. त्यामुळे हताश न होता बळीराजानं पुन्हा सोयाबीनची पेरणी केली. पण ते उगवलंच नसल्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली. अशात लेकरानं लॅपटॉप घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याची बाजी लावली.

महादेव बिक्कड (वय 42 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आत्महत्येची तक्रार नोंदवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परसिरात खळबळ उडाली आहे. आपल्या घरातला करता पुरुष गेल्यामुळे कोणाकडे पाहायचं असा प्रश्न बिक्कड कुटुंबियांवर आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Farmer sucide maharshtra