अर्थमंत्री निर्मला सीतारणम यांनी सांगितलं की, सन 2017 पासूनच येस बँकेच्या आर्थिक व्यवहारावर RBIचं लक्ष आहे. तपास संस्था या प्रकरणी सविस्तर चौकशी करत आहे. मार्च 2019 मध्ये येस बँकेवर RBIनं एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सप्टेंबर 2019 पासून सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)या प्रकरणी चौकशी करत आहे. गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यातही येस बँकेला दंड ठोठावण्यात आला होता. सप्टेंबर 2019 मध्ये येस बँकेचे माजी प्रवर्तकांची संपूर्ण भागिदारी विकली होती. दरम्यान, बँकेची तरलता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली होती. मात्र, याचा काही लाभ होऊ शकला नाही. त्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये हे लक्षात आलं होतं की येस बँकेला कुठूनही पैसा मिळू शकणार नाही, असेही सीतारामण यांनी यावेळी सांगितलं. सन 2014 च्या आधीपासूनच येस बँकेचा कारभार दबावाखाली होता. यामध्ये एस्सेल ग्रुप, डीएचएफएल, आयएलअँण्डएफएस आणि व्होडाफोन सारख्या कॉर्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे. आम्ही ठेवीदारांच्या पैशांवर कोणताही परिणाम होणार नाही. तो सुरक्षित असल्याची ग्वाही निर्मला सीतारणम यांनी दिली आहे.FM Nirmala Sitharaman on #YesBank: RBI has assured that the reconstruction plan will come into play within the moratorium period; SBI has expressed willingness to invest in Yes Bank pic.twitter.com/wY75z16FWZ
— ANI (@ANI) March 6, 2020
एसबीआयने खरेदी करणार 49 टक्के शेअर्स निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, येस बँकेच्या आर्थिक व्यवहाराची RBI पडताळणी करत आहे. काही लोकांना या प्रकरणात व्यक्तीगतरित्या हस्तक्षेप केल्याचेही समोर आले आहे. याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल. दरम्यान, एसबीआयने येस बँकेचे 49 टक्के शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सीतारमण यांनी यावेळी सांगितलं.FM Nirmala Sitharaman on #YesBank: RBI has assured that the reconstruction plan will come into play within the moratorium period; SBI has expressed willingness to invest in Yes Bank pic.twitter.com/wY75z16FWZ
— ANI (@ANI) March 6, 2020
येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून SBI चे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेने केलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने घोळामुळे पीएमसी बँकेवरही निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे खातेदारांचे मोठे हाल झाले आहे. हेही वाचा... येस बँकेवरील निर्बंधामुळे शेअर मार्केट गडगडलं, सेन्सेक्स 1 हजार 400 अंकांनी कोसळला येस बँकेच्या खातेधारकांवर कोसळली कुऱ्हाड, फक्त 50 हजार काढण्याची मुभा सोनं पुन्हा महागलं तर चांदी झाली स्वस्त, 'हे' आहेत शुक्रवारचे दरFM Nirmala Sitharaman on #YesBank: RBI has assured that the reconstruction plan will come into play within the moratorium period; SBI has expressed willingness to invest in Yes Bank pic.twitter.com/wY75z16FWZ
— ANI (@ANI) March 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business news, Finance minister, Nirmala sitaraman, Rbi, SBI, Yes bank