नवी दिल्ली,5 मार्च: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. 50 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. येस बँकेवर सरकारने केलेल्या कारवाईमुळे येस बँकेच्या खातेदारांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळणार आहे. वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीत आली आहे.
Reserve Bank of India: RBI has in consultation with the Central Govt, superseded the Board of Directors of Yes Bank Ltd for a period of 30 days owing to a serious deterioration in the financial position of Bank. Prashant Kumar, ex-DMD & CFO of SBI appointed as the administrator. https://t.co/bBmn5KeekB
— ANI (@ANI) March 5, 2020
येस बँक मोटोरियमच्या कालावधीत ठेवीदारांना फक्त 50 हजारांपेक्षा अधिक जमा (डिपॉझिट) करता येणार नाही. तसेच ठेवीदाराला 50 हजार रुपये पैसे काढता (विथड्रॉल) येणार नाही. अर्थ मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सरकारने गुरुवारी सायंकाळी सहा वाजता येस बँकेवर निर्बंध घातले. 03 एप्रिलपर्यंत हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
अर्थ मंत्रालयाने याबाबत अधिसूचनानुसार..
-येस बॅंकेविरोधात 5 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत सर्व कारवाई पूर्ण करण्यात येणार आहे.
- एखाद्या व्यक्तीचे बँकेत एका पेक्षा जास्त खाते असतील तरीही त्याला एकूण 50 हजार रुपयेच विथड्राल करता येतीस
-बँकेद्वारे जारी केलेल्या कोणत्याही मसुद्यावर पे ऑर्डरवर 50 हजार रुपये कॅप लागू नाही.
-अप्रत्याशित वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत ठेवीदारांना पैसे काढता येणार आहेत.
-अवलंबितसाठी शैक्षणिक फी असल्यास 50 हजार रुपये ठेवीदार पैसे काढू शकतो.
- 50 हजार रुपये स्वत:साठी, अवलंबितांसाठी विवाह खर्च भरण्यासाठी कोणत्याही अनिवार्य आपत्कालीन परिस्थितीत ठेवीदार पैसे काढू शकतात.
हेही वाचा..6 कोटी नोकरदारांना मोठा झटका! EPFOने PFच्या व्याजदरात केली कपात
येस बँकेची पत ढासळल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून SBI चे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेने केलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने घोळामुळे पीएमसी बँकेवरही निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे खातेदारांचे मोठे हाल झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking news, Rbi, Yes bank