Home /News /money /

सोनं पुन्हा महागलं तर चांदी झाली स्वस्त, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

सोनं पुन्हा महागलं तर चांदी झाली स्वस्त, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तर चांदीचे दर घसरले आहेत. शुक्रवारचे दर इथे पाहा

    नवी दिल्ली, 06 मार्च: Cornovirus चा वाढता धोका पाहता देशांतर्गत बाजारात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आज शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देण्यात आली आहे. सोन्याचे दर (Gold Prices today) गगनाला भिडले आहेत. तर चांदीलाही झळाळी (Silver Price today) आली आहे. शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 773 रूपयांनी महागल आहे. मात्र चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो 192 रुपयांनी कमी झाले आहेत. HDFC सिक्युरिटीजचे (कमोडिटी) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार,आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाली. याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला असून सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. सोन्याचा नवा दर: शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. सोनं प्रति तोळा 773 रुपयांनी महाग झालं असून 45,343 रुपये प्रति तोळा सोनं झालं आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 44,570 रुपये होता त्यात वाढ झाली आहे. चांदीचे नवा भाव : चांदीच्या भावात किरकोळ घसरण झाली आहे. शुक्रवारी दिल्ली सराफ बाजार चांदीच्या भावामध्ये 192 रूपयांची घसरण झाली. चांदीचा आजचा दर 48,180 रूपये असून गुरूवारी हा दर 47,988 रूपये होता. कोरोनाचा धोका वाढला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीनी एवढी उसळी घेतली आहे. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसमुळे देशांतर्गत शेअर बाजारावर अवकळा पसरली आहे. त्याचप्रमाणे रुपयाची किंमतही घसरली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळाला. अन्य बातम्या Yes बँकेवरील निर्बंधामुळे शेअर मार्केट गडगडलं,सेन्सेक्स1 हजार 400 अंकांनी कोसळला येस बँकेच्या खातेधारकांवर कोसळली कुऱ्हाड, फक्त 50 हजार काढण्याची मुभा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या