राष्ट्रवादीच्या एका व्यक्तीने शिवेंद्रराजे आणि माझ्यात भांडणं लावली, उदयनराजेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीच्या एका व्यक्तीने शिवेंद्रराजे आणि माझ्यात भांडणं लावली, उदयनराजेंचा गौप्यस्फोट

मी भाजपकडे कुठलीही मागणी करून गेलेलो नाही. माझा हेतू सरळ आहे. 15 वर्ष राष्ट्रवादीने माझी अडचण केली. त्यात 15 वर्षात माझी एकही कामं झालेली नाही अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे.

  • Share this:

सातारा, 15 सप्टेंबर : उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात पोहोचताच त्यांनी शासकीय विश्रामगृहावर शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावर विचारलं असता आमच्यात कधी वाद नव्हता तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील व्यक्ती आमच्यात भांडण लावत होती असा आरोप साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. तर यापुढे आता आता आमच्यात वाद नसणार असंही उदयनराजे भोसले यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. तर उदयनराजे यांच्याशी झालेली बैठक ही औपचारीक असल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी दिली होती.

दरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक लढवण्यासाठी आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पण या पोटनिवडणुकांमध्ये मीच निवडून येणार असल्याचा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

मी भाजपकडे कुठलीही मागणी करून गेलेलो नाही. माझा हेतू सरळ आहे. 15 वर्ष राष्ट्रवादीने माझी अडचण केली. त्यात 15 वर्षात माझी एकही कामं झालेली नाही अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. 'भाजपमध्ये जाण्याआधी मी खूप विचार केला. शरद पवार यांच्याविषयी मला खूप आदर आहे. पण त्यांना अनेकवेळा सांगूनही कामं झाली नाहीत त्यामुळे मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला' असं उदयनराजे म्हणाले.

इतर बातम्या - युतीच्या वादावर 'तुझं-माझं जमेना', भाजपनंतर शिवसेनाही स्वबळावर लढण्याच्या तयरीत?

रोहित पवारांचा 'टि्वटर' वार.. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावरुन मोदींना लगावला टोला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'टि्वटर' वार केला आहे. निमित्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचे...

'#छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. अशा वेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम @narendramodiच्या उपस्थितीत होणार होता, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये केला जातो.', असे रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. स्वदेश आणि स्वधर्मासाठी अतिशय प्रतिकूल काळात वैचारिक आंदोलन आणि संघर्ष करणारे शिवछत्रपतींचे वंशज उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून टीका होत आहे.

इतर बातम्या - उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...!

रोहित पवारांची ही 'फेसबूक पोस्ट' होतेय व्हायरल...

रोहित पवार यांनी फेसबूक पोस्ट लिहूत उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'छत्रपती' या उपाधीचा मान राखला गेला पाहिजे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

'छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. अशावेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायच आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो, तसाच आपणही तो मान ठेवावा', अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार होते, मात्र ते उपस्थित राहू शकले नाही. अशा रीतीने नरेंद्र मोदी यांनी छत्रपती या उपाधीचा मान राखला नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

इतर बातम्या - साता जन्माचं वचन दिलेल्या पतीची निर्घृण हत्या, पोलिसांना फोनवर पत्नी म्हणते...!

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शनिवारी नवी दिल्लीत भाजप प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, यांच्यासह राज्यातल्या तसेत केंद्रातील अनेक दिग्गजांची हजेरी होती.

VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लाडूसाठी तू तू-मैं मैं; घातला तुफान राडा

First published: September 15, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading