• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • साता जन्माचं वचन दिलेल्या पतीची केली निर्घृण हत्या, पोलिसांना फोन करून पत्नी म्हणते...!

साता जन्माचं वचन दिलेल्या पतीची केली निर्घृण हत्या, पोलिसांना फोन करून पत्नी म्हणते...!

रात्री दोन वाजेच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने आपल्या पतीला ठार मारलं. पत्नीने स्वतः सकाळी पोलिसांना बोलावून याविषयी माहिती दिली.

 • Share this:
  यमुनानगर (हरियाणा) 14 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये हत्येच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच गुन्ह्याचा एक प्रकार समोर आला आहे. एका पत्नीने पतीचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. रात्रीच्या किर्र अंधारात संतापलेल्या पत्नीने पतीचा खून केला. सगळ्यात गंभीर म्हणजे तिने स्वत: पोलिसांना फोन केला आणि मी माझ्या पतीचा खून केला असल्याची माहिती दिली. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री दोन वाजेच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने आपल्या पतीला ठार मारलं. पत्नीने स्वतः सकाळी पोलिसांना बोलावून याविषयी माहिती दिली. आरोपी पत्नीच्या डोक्यावरही जखमीचे निशान सापडले आहेत. शुल्लक कारणावरून झालेल्या वादात पत्नीने असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपी पत्नीकडून पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा घरात रक्ताच्या थारोळ्यात पतीचा मृतदेह पडला होता तर त्याच्याशेजारी पत्नी बसली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास सुरू आहे. पोलिस आरोपी पत्नीला अटक करुन तिची चौकशी करत आहेत. पत्नीने एवढं मोठं पाऊल का उचललं हे चौकशीनंतर उघड होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, छत्तीगडमध्ये एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांनीच सुपारी देऊन मारून टाकल्य़ाची घटना घडली आहे. बहिणीवर बलात्कार करण्याच्या तयारीत होता सख्खा भाऊ, असा झाला 'Game Over' हत्येची एक हृदय विदारक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मर्डरचा अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 6 ऑगस्ट गावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासणीत हे संपूर्ण प्रकरण खुनाचं असल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह 5 जणांना अटक केली आहे. मृतक त्याच्या पत्नीला रोज मारहाण करायचा आणि त्याने बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या वडिलांचीही हत्या केली होती. मृत व्यक्तीला त्याच्या घरच्यांनीच सुपारी देऊन संपवलं असल्याचं धक्कादायक सत्य पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मृत व्यक्तीची आई आणि बहिण असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलाच्या अशा विचित्र वागण्याला वैतागून त्यांच्या घरच्यांनी सुपारी देऊन त्याची हत्या केली. अशाप्रकारे पोलिसांना आला कुटुंबावर संशय... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाखालील कालव्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो पप्पू उर्फ ​​सुरेंद्र यदू या व्यक्तीचा असल्याचं समजलं. मृताच्या हातावर एस(S)हे अक्षर गोंदण्यात आलं होतं तर त्याच्या कपड्यांवरून मृताची ओळख पडली. त्यानंतर पोलिसांना कुटुंबावर संशय आला. मेकाहारा रुग्णालयाकडून मिळालेल्या शवविच्छेदन अहवालात डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं कारण सांगितलं आहे. मृताच्या शरीरावरही जखमा झाल्या होत्या. इतर बातम्या - या काकूंनी केली 'गलती से मिस्टेक', VIDEO होतोय तुफान व्हायरल पप्पू दारू प्यायचा आणि मारहाण करायचा! मृत पप्पू यदुला दारूचे व्यसन होते. यानंतर तो पत्नीला मारहाणही करत असे. दारू पिऊन घरी आल्यानंतर पप्पू रोज पत्नीला मारायचा. तिच्यावर रोज अत्याचार सुरू होते अशी माहिती तिने पोलिसांना दिली. तर मेव्हण्यासोबत जाऊन मी पतीची सुपारी दिली असल्याचंही तिने म्हटलं. मृत पप्पूने बहिणीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर बातम्या - BREAKING VIDEO: बारामतीत राडा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्यांनी थांबवलं वडिलांचीही केली हत्या पप्पू यदु हा लहानपणापासूनच भांडण करायचा. सुमारे 12 वर्षांपूर्वी पप्पूचा त्याच्या वडिलांशी एका गोष्टीवरून वाद झाला आणि त्याने त्याला दगडाने ठेचून ठार केलं. यानंतर, त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. सुधारगृहातून परत आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचं लग्न केलं. त्याचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्याची पत्नी माहेरी गेली. यानंतर सात वर्षांपूर्वी पप्पूने दीपा बंजारे नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं आणि ते मोहरंगा इथे राहत होते. इतर बातम्या - मेगाभरतीनंतर आता भाजपचा मास्टर प्लॅन, युतीचं घोडं अडलेलं असताना नवा प्रचार बहिणीवर केला बलात्काराचा प्रयत्न... 27 जुलै रोजी पप्पू बहिणीला भेटण्यासाठी भिलाईच्या घरी गेला गोता. तिथे पत्नीला पाहून त्याला राग आला आणि त्याने तिला जबरदस्तीने मारहाण केली. त्याचवेळी तिची बहीण रंजना कामावरुन परत आली. तिने मध्यस्थी केली असता पप्पूने तिलाही मारहाणही केली. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. इतर बातम्या - अंत्यसंस्कारानंतर सुरू होती श्राद्धाची तयारी, अचानक घरी पोहोचला मृत तरुण! गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO
  Published by:Renuka Dhaybar
  First published: