• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...!

उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...!

सध्याचा भाजप हा मोदी आणि फडणवीस यांचा आहे. तो वाजपेयी आणि मुंडेचा पक्ष राहिलेला नाही अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे.

  • Share this:
पुणे, 14 सप्टेंबर : भारतीय जनता पार्टीसोबत राहून मी घेतलेला अनुभव छत्रपती उदयनराजे यांना सांगितला आहे. आता त्यांना अनुभव घ्यायचा असेल म्हणून ते भाजपात गेले असावेत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पुण्यात दिली. सध्याचा भाजप हा मोदी आणि फडणवीस यांचा आहे. तो वाजपेयी आणि मुंडेचा पक्ष राहिलेला नाही अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर चहुबाजूने टीका होत आहे. याविषयी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, 'चार-पाच दिवसांपूर्वी मी छत्रपती उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपमध्ये जात असल्यास धोके तपासून पाहा. असा सल्ला त्यांना दिला होता. पण त्यांना स्वत: अनुभव घ्यायचा आहे.' पुण्यात झालेल्या बैठकीची माहिती शेट्टी यांनी दिली. तर यावेळी ते विधानसभा लढवणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक लढवण्यासाठी आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकत उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. नवी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात दाखल झाले आहे.  शुक्रवारी संध्याकाळी उदयनराजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर आता उदयनराजेंना पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. इतर बातम्या - मेगाभरतीनंतर आता भाजपचा मास्टर प्लॅन, युतीचं घोडं अडलेलं असताना नवा प्रचार विधानसभा निवडणुकीसोबत सातारा पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.  उदयनराजे यांच्या विरोधात आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची मनधरणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याआधी श्रीनिवास यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. इतर बातम्या - BREAKING VIDEO: बारामतीत राडा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्यांनी थांबवलं 'राजा गेला तरी प्रजा आमच्यासोबत' दरम्यान, उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कमळ हाती घेतलंय खरं पण आता त्यांच्यावर राष्ट्रवादीतून टीकाही होत आहे.  साताऱ्याची पोटनिवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास नवाब मलिकांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे राजा गेला तरी प्रजा आमच्यासोबत आहे, एक गेला तर दुसरा उमेदवार आमच्याकडे तयार आहे असं म्हणत भुजबळांनी राजेंना टोला लगावला. इतर बातम्या - साता जन्माचं वचन दिलेल्या पतीची निर्घण हत्या, पोलिसांना फोनवर पत्नी म्हणते...! स्वकीयांशी संघर्ष करावा लागला हे दुर्दैव होतं - उदयनराजे उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर कुणाचंही नाव न घेता टीका केली आहे. आधी उमेदवारी द्यायची आणि अडवणूकही करायची, यामुळेच अनेक जण पक्ष सोडूव जातायत असं उदयनराजे भोसले म्हणाले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी ही टीका केली. तर स्वकीयांशी संघर्ष करावा लागला हे दुर्दैव होतं, असंही ते म्हणाले. श्रीनगरमध्ये तिरंगा फडकला, बारामतीतलं मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण
Published by:Renuka Dhaybar
First published: