मुंबई, 23 सप्टेंबर : कोरोनासारखा जीवघेणा संसर्ग, मराठा आरक्षण आणि मुसळधार पाऊस अशा मुद्द्यांवर राज्यात वातावरण तापलं असताना आता राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरूच आहे. यानंतर आता भाजपचे अनेक नेते हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ता गमावल्यानंतर आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रामधील भाजप नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे याच भागातून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. यासंबंधी एनसीपी कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यासह उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषत भाजपातील काही नेते यांना राष्ट्रवादी पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खासगी रुग्णालयात पाठवलेल्या 48 कोरोना बाधितांचा मृत्यू, तातडीने चौकशीचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेस सध्या वेट अँड वॉच भूमिकेमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. जोपर्यंत भाजत नेते पक्षात प्रवेशाची अधिकृत घोषणा करत नाहीत तोपर्यंत इतर पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
'केम छो वरळी' म्हणत मनसेनं केलं आदित्य ठाकरेंना ट्रोल, संदीप देशपांडेंचं ट्वीट
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता. घनदाट हे परभणीतून अपक्ष आमदार म्हणून निवडले गेले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी घनदाट यांनी विधिमंडळात शिपाई म्हणून 17 वर्षं काम केलं होतं आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून 3 वर्षं काम केलं होतं.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि स्वानंदी देखील उपस्थित होते. तर यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नियुक्त्या देखील करण्यात आल्या.