मुंबई, 23 सप्टेंबर : मुसळधार पावसामुळे राज्यात भीषण अवस्था झाली आहे. जागोजागी आणि अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबईत तर सखल भागात पाणी साचलं असून सगळी वाहतूक ठप्प झाली आहे. अशात आता या परिस्थितीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. धुवांधार पावसामुळे वरळी भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. यावरुन मनसेनं आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
वरळीत पाणी शिरलेल्या घरांचा व्हिडिओ शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘केम छो वरळी’ असं ट्विट केलं आहे. आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी वरळीत 'केम छो वरळी' असे पोस्टर लावले होते. त्यामुळे आजच्या पावसाच्या निमित्ताने संदीप देशपांडे यांनी आदित्य यांना ट्रोल केलं आहे.
खरंतर, राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे कालपासून सुरू असलेल्या पावसाने धूमशान घातलं आहे. 24 तासात झालेल्या तुफान पावसानं महाराष्ट्र जलमय झाला आहे. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पाऊस म्हटलं की मुंबईत पाणी साचणं आलंच. पण यंदा मुंबईत अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांच्या पीकाचं नुकसान झालं आहे.
शिवसेनेत शोककळा, कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवकाचं निधन
केम छो वरळी pic.twitter.com/pWiGcgwPU1
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 23, 2020
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. मुंबईत पावसानं शनिवारी संध्याकाळपासून जोर धरला आणि रात्रभर धुमशान सुरू होतं. जवळपास 180 मिमीहून अधिक पावसाची नोंद पहाटेपर्यंत करण्यात आली असून आता प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आला आहे.
मुंबईत अनेक भागांमध्ये 3 फुटांपर्यंत रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दाणादाण उडाली आहे. रेल्वे स्थानकात रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यानं वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला आहे.
24 तासांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त, अशी आहे आजची आकडेवारी
मुसळधार पावसामुळे आणि एकूण सध्याची परिस्थिती पाहता बृहनमुंबई महापालिकेनं आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवा आणि कामं वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच खासगी कार्यालये आणि इतर कामकाज बंद ठेवण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे.