Home /News /news /

धक्कादायक! खासगी रुग्णालयात पाठवलेल्या 48 कोरोना बाधितांचा मृत्यू, तातडीने चौकशीचे आदेश

धक्कादायक! खासगी रुग्णालयात पाठवलेल्या 48 कोरोना बाधितांचा मृत्यू, तातडीने चौकशीचे आदेश

शहरातील चार खासगी रुग्णालयात एकूण 48 कोरोना-संक्रमित रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं.

    लखनऊ 23 सप्टेंबर : देशात कोरोनाचा (COVID-19) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना बाधित रूग्णांच्या तपासणी आणि उपचारामध्ये 4 खासगी रुग्णालयात (Private Hospitals) गंभीर दुर्लक्ष झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील चार खासगी रुग्णालयात एकूण 48 कोरोना-संक्रमित रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना राजधानी लखनऊची (Lucknow) असून संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात डीएम अभिषेक प्रकाश (DM Abhishek Prakash) यांनी चार खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. तर यावर तातडीने स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. नोटीसमध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की, रुग्णांकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणाऱ्या आणि त्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रुग्णालयांवर महामारी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 'केम छो वरळी' म्हणत मनसेनं केलं आदित्य ठाकरेंना ट्रोल, संदीप देशपांडेंचं ट्वीट या रुग्णालयात झाला रुग्णांचा मृत्यू चरक रुग्णालयात 10 कोरोना संक्रमित रुग्णांचा एकावेळी जीव गेला आहे. यानंतर चंदन रुग्णालयात पाठवलेल्या 11 रुग्णांचा जीव गेला. अपोली हॉस्पिटलमध्ये 17 कोरोना संक्रमित रुग्णांचा एकाचेवेळी जीव गेला. या रुग्णालया पाठवल्या जाणाऱ्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. शरीर सुखाला नकार दिल्यानं भावाजयीचा खून, पुणे जिल्ह्यातील थरारक घटना मिळालेल्या माहितीनुसार, अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांसोबत हलगर्जीपणा झाला असल्याचं समोर आलं आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात भरती होताच रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत नेमकं काय चुकतं आहे याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डीएम अभिषेक प्रकाश यांनी सांगितलं की, या प्रकरणात रुग्णांच्या तपासणीत निष्काळजीपणा दिसून आला आहे. यावर रुग्णालयांना जाब विचारला गेला आहे. उत्तर मिळाल्यानंतर रुग्णालयात कारवाई केली जाईल.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms, Lockdown

    पुढील बातम्या