मराठी बातम्या /बातम्या /देश /Devendra Fadnavis: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना भाजपचा पाठिंबा? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना भाजपचा पाठिंबा? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंना भाजपचा पाठिंबा? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंना भाजपचा पाठिंबा? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. शिवसेनेने सहावी जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर संभाजीराजे हे सुद्धा अपक्ष म्हणून ही जागा लढणार आहेत.

नवी दिल्ली, 19 मे : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. या सहा जागांपैकी सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. तर शिवसेनेने (Shiv Sena) सुद्धा सहावी जागा लढण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप (BJP) काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार संदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. महाराष्ट्रातून भाजपच्या दोन जागा तर येतच आहेत. तिसऱ्या जागेबाबत निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईन. आम्ही संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. अशा प्रकारच्या निवडणुकांबाबत केंद्रीय स्तरावर निर्णय होतो. छत्रपती संभाजीराजे यांच्या संदर्भात देखील निर्णय घेण्याचे अधिकार हे केंद्रीय नेतृत्वाकडे आहेत.

उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आमदारांचे वजन वाढले आहे. शिवसेनेनं आपला दूसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवास्थानी बैठक बोलवली आहे. या बैठकीत अपक्ष उमेदवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

"आकडे आणि मोड दोन्ही मविआकडे..."

राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे. असं ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काय आहे संख्याबळ?

सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.

राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Elections, Rajya sabha, Sambhajiraje chhatrapati, Shiv sena