Home » Tag » Rajya Sabha

राज्यसभा - Rajya Sabha

    केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह 15 राज्यातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या एकूण 57 खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 10 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  राज्यसभेतून भाजपकडून पियुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे यांची जागा रिक्त होत आहे.  तर शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून पी. चिदंबरम असे 6 सदस्य 4 जुलैला निवृत्त होणार आहे. या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी मैदानात उतरले आहे.  त्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. संभाजी राजे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी राज्यातील सर्व आमदारांना पत्राद्वारे केली आहे. तर दुसरीकडे, संभाजीराजेंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पण, दुसरीकडे शिवसेनेनं दुसरी जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. एवढंच नाहीतर संभाजीराजे यांना शिवसेनेनं आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी ऑफर दिली आहे.पण, संभाजीराजे यांनी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर भाजपनेही तिसरी जागा लढवण्याची चाचपणी केली आहे. जर भाजपने तिसरा उमेदवार उतरवला तर राज्यसभेची निवडणूक अटळ मानली जात आहे. त्यामुळे राज्यसभेत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वााचे ठरणार आहे.