Home /News /mumbai /

राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एंट्री, अपक्ष आमदारांना 'वर्षा'वर बोलावले!

राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एंट्री, अपक्ष आमदारांना 'वर्षा'वर बोलावले!

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवास्थानी बैठक बोलवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवास्थानी बैठक बोलवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवास्थानी बैठक बोलवली

मुंबई, 18 मे : राज्यसभा निवडणुकीवरून (rajya sabha election 2022) राज्यात आता राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेनेनं दुसरी जागा लढवणार अशी घोषणा केली आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी पुढाकार घेतला आहे. सहावी जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांना बैठकीला बोलावले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि त्यानंतर संभाजीराजेंना कोण पाठिंबा देणार अशी चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला पण शिवसेनेनं दुसरा उमेदवार उतरवणार असल्याची तयारी सुरू केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आमदारांचे वजन वाढले आहे.  शिवसेनेनं आपला दूसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवास्थानी बैठक बोलवली आहे.  या बैठकीत अपक्ष उमेदवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (स्पर्धा परीक्षा कुठलीही असो GK चं टेन्शन घेऊ नका; असं वाढवा General Knowledge) दरम्यान,  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे, शिवसेना सहावी जागा लढवणार आणि जिंकणार सुद्धा. राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे. असं ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. (निसर्गरम्य वातावरणातली ही Valley of Flowers पाहिलीत का? सुंदर PHOTOS) राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या