Home /News /mumbai /

राज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच; सहाव्या जागेसाठी शिवसेना आग्रही, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच; सहाव्या जागेसाठी शिवसेना आग्रही, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पहायला मिळत आहे.

मुंबई, 17 मे : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) रस्सीखेच पहायला मिळत आहे. कारण, सहाव्या जागेवर शिवसेनेने (Shiv Sena) दावा केला असून या जागेसाठी आग्रह धरला आहे. महाविकास आघाडीकडे राज्यसभेच्या चार जागा जिंकण्याची मते आहेत. सहाव्या जागेसाठी कुठल्याही पक्षाकडे विजयी होण्याइतपत मते नाहीयेत. या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय शरद पवारांनी (Sharad Pawar) संभाजीराजेंना पाठींबा दिला असल्याचा दावा संभाजीराजेंच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. वाचा : 'आमचा सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर.. : देवेंद्र फडणवीस राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते. भाजप संभाजीराजेंना समर्थन देणार की आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरवणार हे पहावं लागेल. तसेच शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिला तर त्यासाठी महाविकास आघाडी समर्थन देणार का? हे सुद्धा महत्त्वाचं आहे. संभाजीराजेंचा खासदारकीचा मार्ग मोकळा? संभाजीराजे (sambhaj raje) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. संभाजीराजे यांनी स्वत: ची संघटना स्थापन करून अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक (Rajya Sabha MP eleaction ) लढवणार अशी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत होकार दर्शवला असल्याचं बोललं जात आहे. संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Shiv sena

पुढील बातम्या