जाहिरात
मराठी बातम्या / देश / शिवसेनेचा निर्यण पुन्हा लांबला, गोविंदाचा मुंबईत मृत्यू, सोमय्यांचा सेना नेत्याला इशारा TOP बातम्या

शिवसेनेचा निर्यण पुन्हा लांबला, गोविंदाचा मुंबईत मृत्यू, सोमय्यांचा सेना नेत्याला इशारा TOP बातम्या

शिवसेनेचा निर्यण पुन्हा लांबला, गोविंदाचा मुंबईत मृत्यू, सोमय्यांचा सेना नेत्याला इशारा TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीखे’ पडत असल्याचे दिसत आहे. आधी 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर यात बदल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. दहीहंडीवेळी सातव्या थरावरून कोसळलेल्या गोविंदाचा (Dahi Handi Govinda Death) मृत्यू झाला आहे. यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. शिंदे की ठाकरे? शिवसेना पुन्हा ‘वेटींग’वर खरा शिवसेना (shivsena) पक्ष कोणाचा? यासाठी ठकारे गट आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र, या प्रकरणात आता ‘तारीख पे तारीख’ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आधी 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर यात बदल करण्यात आला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सोमय्यांचा नाव घेऊन शिवसेना नेत्याला इशारा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि भाजपचं (BJP) सरकार आल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांचं रिसॉर्ट (Anil Parab Resort) लवकरच तुटणार असल्याचं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. निधी वाटपावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीतील मित्रपक्ष आम्हाला निधी देत नसल्याचा आरोप केला होता. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला मारला आहे. तसेच आघाडी सरकारने पाडलेला चुकीचा पायंडा आम्ही चालवणार नसल्याचेही सांगितले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. संजय राऊत ‘आर्थर रोड’मधून लिहितायत पुस्तक शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अर्थात पीएमएलए (PMLA) अंतर्गत आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) संजय राऊत पुस्तक लिहित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी इडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. Ketaki Chitale : केतकी चितळेला मोठा दिलासा अभिनेत्री केतकी चितळे पोस्टप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्यासह आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी चौकशीसाठी केतकीला फक्त कळवा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मुंबईत मृत्यू दहीहंडीवेळी सातव्या थरावरून कोसळलेल्या गोविंदाचा (Dahi Handi Govinda Death) मृत्यू झाला आहे. शिवशंभो गोविंदा पथकाचा संदेश प्रकाश दळवी हा विलेपार्लेमध्ये जखमी झाला होता, यानंतर त्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केलं. संदेश दळवी हा 22 वर्षांचा गोविंदा दोन दिवस रुग्णालयात होता, त्याच्या मेंदूला दुखापत झाली होती. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबई ते दिल्ली फक्त 12 तास! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते दिल्ली हा सर्वात अद्ययावत महामार्ग होणार असल्याचं सांगितलं. या महामार्गाचं 70 टक्के काम पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कसा असेल हा महामार्ग? काय आहेत सुविधा? चला सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात