मुंबई, 22 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच चर्चेत आली होती. या प्रकरणात केतकी विरोधात संपूर्ण राज्यभरात FIR दाखल करण्यात आल्या होत्या. तिच्या विरोधात पहिली FIR ही ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून केतकी विरोधात राज्यभरात दाखल करण्यात आलेल्या एकूण 22 FIR ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. म्हणजेच आता केतकीला राज्यभरातील पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही सगळ्या FIRची चौकशी एकाच ठिकाणी म्हणजेच ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात होणार आहे. या प्रकरणी केतकी विरोधात एकूण 22 FIR आणि विद्यार्थी निखिल भामरे विरोधात एकूण सहा FIR दाखल करण्यात आल्या होत्या. आता निखिल विरोधातील सहा FIR देखील नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. निखिलनं दोघांविरोधात राज्यभरात दाखल करण्यात आलेल्या FIR रद्द करावी आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात केली होती. हेही वाचा - ketaki chitale: शाई फेकल्यामुळे खराब झालेल्या ब्लाऊजचं केतकी चितळेनं काय केलं पाहा; आता VIDEO होतोय व्हायरल केतकी चितळे या प्रकरणी जवळपास 25 दिवस तुरुंगात होती. विद्यार्थी निखिलनं दाखल केलेल्या याचिकेत, या प्रकरणात पहिली FIR ज्या ठिकाणी दाखल करण्यात आली त्याच ठिकाणी इतर FIR वर्ग करायला हवे अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्या मागणीवर विचार करुन मुंबई हायकोर्टानं नौपाडा आणि कळवा पोलीस ठाण्यात सगळ्या FIR वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचा - Ketaki Chitale EXCLUSIVE: जेलमध्ये नेताना केतकी बरोबर घडलं असं काही भयानक, ऐका तिच्याच तोंडून शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरुन मोठी खळबळ उडाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात असून दोन समुदायांमध्ये भांडणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केतकीवर करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.