मुंबई, 22 ऑगस्ट : दहीहंडीवेळी सातव्या थरावरून कोसळलेल्या गोविंदाचा (Dahi Handi Govinda Death) मृत्यू झाला आहे. शिवशंभो गोविंदा पथकाचा संदेश प्रकाश दळवी हा विलेपार्लेमध्ये जखमी झाला होता, यानंतर त्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केलं. संदेश दळवी हा 22 वर्षांचा गोविंदा दोन दिवस रुग्णालयात होता, त्याच्या मेंदूला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण यात त्यांना यश आलं नाही. 22 वर्षांचा संदेश दळवीच्या घरात आई-वडील आणि तीन भावंडं आहेत. मूळचा पार्ल्याचा असलेला संदेश सध्या कुर्ल्याला राहत होता.
मुंबईमध्ये सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू#DahiHandi #Govinda #Mumbai pic.twitter.com/QpUCGmufQa
— News18Lokmat (@News18lokmat) August 22, 2022
दरम्यान या गोविंदाच्या मृत्यूचं कुणी राजकारण करू नये, सरकार संवेदनशील असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. सरकारने 10 लाखांचं विमा कव्हर पहिल्यांदा दिलं होतं. सरकार या गोविंदाच्या कुटुंबाला सर्व मदत देईल. गोविंदाच्या मृत्यूचं भांडवल म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय का? ठाकरे साहेबांची शिवसेना हे चुकीचं करतेय, असं प्रविण दरेकर म्हणाले.

)







