मुंबई, 29 ऑगस्ट : भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत धक्कादायक दावे केले आहेत. "वाईन विक्रीचं धोरण मागील राज्य सरकारने आणलं होतं. हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही", असं विधान शरद पवार यांनी केलं. मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. अखेर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार आहे.
मोहित कंबोज यांचे रोहित पवारांबद्दल धक्कादायक दावे
भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत धक्कादायक दावे केले आहेत. मोहित कंबोज यांनी ट्विटरवर रोहित पवार यांच्याबद्दल गंभीर दावे करत मोठा बॉम्ब टाकला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
'महाविकास आघाडी सरकारचं वाईन विक्रीचं धोरण उत्तम होतं', शरद पवारांचं मोठं विधान
"वाईन विक्रीचं धोरण मागील राज्य सरकारने आणलं होतं. हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही", असं विधान शरद पवार यांनी केलं. दरम्यान, आजही देशातील 60 टक्के जनता शेती करते. जगाची आणि देशाची लोकसंख्या पाहता, शेतकऱ्यांचा आकडा दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसंख्या वाढत असताना शेतीवर बोजा किती टाकायचा याचाही विचार केला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान
मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमात केलं आहे. दरम्यान डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एकट डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहे, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
काँग्रेसच्या प्रवेशाबाबत शेवटी नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं...
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून डच्चू दिल्याच्या वृत्तानंतर चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळात तर नितीन गडकरी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
शिवसेनेचा थेट मोदी-शाहांवर हल्ला
गुजरातमधील बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेवर शिवसेनेने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हल्ला चढवला. बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार करणे? ही हिंदू संस्कृती आहे का? असा थेट सवाल केला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
अखेर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार!
काँग्रेसने काही दिवसांपूर्वी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली होती. काँग्रेसने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, या वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान आपल्या नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मोदींच्या त्या वक्तव्यावरुन राहुल गांधीचा निशाणा
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर वेगवेगळ्या कारणांवरुन सातत्याने निशाणा साधत असतात. त्यांनी पुन्हा आता एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या खादीच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर आता परिस्थिती कशी आहे?
नोएडास्थित सुपरटेकचा सुमारे 100 मीटर उंच असलेला सुपरटेक ट्विन टॉवर रविवारी जमीनदोस्त होताच हा परिसर धूळ, धूर आणि रोडारोड्याने व्यापला होता. येथे पहिल्या स्फोटानंतरच परिस्थिती बदलली आणि दोन्ही टॉवर पडताच आजूबाजूचा संपूर्ण परिसर धुळीने माखला गेला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit pawar, काँग्रेस