जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि...', गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

'स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि...', गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

मंत्री गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केलं आहे.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदुरकर, जळगाव, 28 ऑगस्ट : मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केलं आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमात याबाबतचं वादग्रस्त विधान केलं. यावेळी गुलाबरावांनी चांगलीच टोलेबाजी केली. आम्ही जनरल फिजीशीअन आहोत. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमात केलं आहे. दरम्यान डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एकट डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहे, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं. ( बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार करणे ही हिंदू संस्कृती आहे का? शिवसेनेचा थेट मोदी-शाहांवर हल्ला ) दरम्यान, 50 खोके एकदम ओक्के, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला हिणवलं जात आहे. याच टीकेवर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांना उघडपणे चॅलेंज दिलं. “मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ”, असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात