मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'महाविकास आघाडी सरकारचं वाईन विक्रीचं धोरण उत्तम होतं', शरद पवारांचं मोठं विधान

'महाविकास आघाडी सरकारचं वाईन विक्रीचं धोरण उत्तम होतं', शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

'महाविकास आघाडी सरकारचं वाईन विक्रीचं धोरण उत्तम होतं', असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Chetan Patil

पुणे, 28 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला होता. सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यास महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली होती. पण या निर्णयाला राज्यभरातून प्रचंड विरोध झाला होता. अनेक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे तत्कालीन सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या. या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. पण या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच आता राज्यात नव्याने स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार हा निर्णय मागे घेणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांनंतर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं.

"वाईन विक्रीचं धोरण मागील राज्य सरकारने आणलं होतं. हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही", असं विधान शरद पवार यांनी केलं. दरम्यान, आजही देशातील 60 टक्के जनता शेती करते. जगाची आणि देशाची लोकसंख्या पाहता, शेतकऱ्यांचा आकडा दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसंख्या वाढत असताना शेतीवर बोजा किती टाकायचा याचाही विचार केला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

(शिंदे गटातील गुलाबराव पाटलांचं जनतेला खुलं चॅलेंज; ...अन्यथा 9 व्या दिवशी मंत्रिपद सोडेन)

 "शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो. अर्थकारण व्यवस्थित राहिले नाही तर कर्जाच्या बोझाखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो. ही परिस्थिती येऊ नये यासाठी याबाबतचा आपण एकत्रितपणे विचार करायला हवा", असं देखील पवार म्हणाले.

"देशातून 8 टक्के द्राक्षाची निर्यात होते. तर 92 टक्के द्राक्षाची भारतीय बाजारपेठेत विक्री केली जाते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठा कशी मोठी होईल आणि आर्थिक उलाढाल मोठी होईल याकडे लक्ष द्यायला हवं. यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारशी बोलणार", अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.

First published:

Tags: NCP, Sharad Pawar