जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तेव्हा ऑफर होती...'; काँग्रेसच्या प्रवेशाबाबत शेवटी नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं...

'तेव्हा ऑफर होती...'; काँग्रेसच्या प्रवेशाबाबत शेवटी नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं...

'तेव्हा ऑफर होती...'; काँग्रेसच्या प्रवेशाबाबत शेवटी नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं...

काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले नितीन गडकरी…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 28 ऑगस्ट : भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून डच्चू दिल्याच्या वृत्तानंतर चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळात तर नितीन गडकरी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचंही म्हटलं जात आहे. नितीन गडकरीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र गडकरींना दूर करून त्याऐवजी नरेंद्र मोदींची वर्णी लावण्यात आली. आता केंद्रीय संसदीय मंडळातून हटवल्यानंतर गडकरी नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

खुद्द गडकरींनीच याचा खुलासा केला आहे. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस प्रवेश करणार नाही. यावेळी त्यांनी एक जुना किस्साही सांगितला. ते म्हणाले की, जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. यावेळी गडकरी म्हणाले होते की, एकवेळ मी विहिरीत उडी मारेल, परंतू काँग्रेसमध्ये येणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही. असं त्यावेळीच गडकरींनी स्पष्ट सांगितलं होतं. Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या मनातलं ओठावर आलच, म्हणाले गरज संपल्यावर फेकून देणे चूक आपली रोखठोक भूमिका आणि चांगलं काम यासाठी गडकरींना ओळखलं जातं. चांगलं काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही ते सर्वांसमोर झाडाझडती घेतात. 2024 च्या लोकसभा निवडणूका जवळ येत असताना गडकरी यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून हटवण्यात आलं आणि त्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना घेण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात