नोएडा, 28 ऑगस्ट : नोएडास्थित सुपरटेकचा सुमारे 100 मीटर उंच असलेला सुपरटेक ट्विन टॉवर रविवारी जमीनदोस्त होताच हा परिसर धूळ, धूर आणि रोडारोड्याने व्यापला होता. येथे पहिल्या स्फोटानंतरच परिस्थिती बदलली आणि दोन्ही टॉवर पडताच आजूबाजूचा संपूर्ण परिसर धुळीने माखला गेला. आजूबाजूच्या इमारतीही या ढगात दडल्या. ट्विन टॉवरच्या ढिगाऱ्यातून निघणाऱ्या धुळीमुळे काही काळ धुकं एवढं वाढलं होतं की काहीच दिसत नव्हतं. ट्विन टॉवर्सच्या विध्वंसातून अंदाजे 80,000 टन राडारोडा निर्माण झाला आहे. स्फोटादरम्यान हवेत धुळीचे प्रचंड लोट दिसून आले. ट्विन टॉवर पाडल्यामुळे सुमारे 80 हजार टन रोडारोडा बाहेर ट्विन टॉवर पाडण्यापूर्वी आजूबाजूच्या इमारती आणि संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज या दोन सोसायट्यांमधील सुमारे 5,000 लोकांना बाहेर काढण्यात आले. याशिवाय, मांजरी आणि कुत्र्यांसह सुमारे 3,000 वाहने आणि 150-200 पाळीव प्राणी देखील बाहेर नेण्यात आले. अंदाजानुसार, ट्विन टॉवर पाडल्यामुळे सुमारे 80 हजार टन राडारोडा बाहेर आला आहे.
ट्विन टॉवर्स ही पाडण्यात आलेल्यापैकी भारतातील आतापर्यंतची सर्वात उंच वास्तू होती. राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील सेक्टर 93A मधील सुपरटेक एमराल्ड कोर्ट हाउसिंग सोसायटीमध्ये 2009 पासून ‘अपेक्स’ (32 मजले) आणि ‘सायन’ (29 मजले) टॉवर्सचे बांधकाम सुरू होते. वाचा - भूकंपासारखा हादरला संपूर्ण परिसर! 32 मजली ट्विन टॉवर जमीनदोस्त, EXCUSLIVE VIDEO 17 कोटी खर्च सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्याची प्रक्रीया पूर्ण झाली आहे. दोन्ही टॉवर पाडण्यासाठी तब्बल 17 कोटी रुपये खर्च केले गेले असून हा खर्चही बिल्डर उचलणार आहे. ट्विन टॉवर अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त झाला. हा ट्विन टॉवर ज्या ठिकाणी बांधला आहे, त्या जागेची किंमत सध्या 10 हजार रुपये प्रति चौरस फूट आहे. म्हणजे ट्विन टॉवरची किंमत 1 हजार कोटींहून अधिक होती. पण वादामुळे ट्विन टॉवरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर सुमारे 800 कोटी ट्विन टॉवरची किंमत ठरली होती. ते तयार करण्यासाठी 250 ते 300 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.