मुंबई, 28 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत कधी कोणती बातमी येईल याचा काहीच भरोसा राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काल एक धक्कादायक बातमी समोर आली होती. रोहित पवार कधी काळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीच्या प्राथमिक चौकशीचे ईडीने आदेश दिल्याची माहिती समोर आली होती. रोहित पवारांनी त्यानंतर आपल्याला या चौकशीबद्दल माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसेच आपण त्या कंपनीचे कधीच संचालक नव्हतो, असं स्पष्टीकरण दिलं होतं. याशिवाय केंद्रीय यंत्रणांनी आपली याआधीदेखील चौकशी केली होती आणि पुन्हा चौकशीसाठी बोलावलं तर आपण सहकार्य करु, असं विधान रोहित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवर नवा बॉम्ब टाकला आहे. भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत धक्कादायक दावे केले आहेत. मोहित कंबोज यांनी ट्विटरवर रोहित पवार यांच्याबद्दल गंभीर दावे करत मोठा बॉम्ब टाकला आहे. विशेष म्हणजे मोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांचा उल्लेख गबरु जवान असा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मिलिए भारत के #JeffBezos से- 2006 में 21 साल के इस गबरू जवान ने Green Acres Resorts के तहत 200 तरह के अलग अलग- प्लास्टिक,हीरा,गोल्ड,बिल्डर,इक्स्पॉर्ट,इंपोर्ट,दारू से चड्डी तक का धंधा करने वाला #StartUp शुरू किया।गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकर्ड से विनती है कि उनका नाम रेकर्ड में डालें
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
( दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा, शिंदे गटाने केला दावा, वाद पेटणार! ) “भेटा भारताच्या #JeffBezos ला, ज्याने 2006 मध्ये 21 वर्षाच्या या गबरु जवानाने ग्रीन एकर रिसॉर्ट कंपनीच्या माध्यमातून 200 प्रकारचे विविध प्लास्टिक, हिरा, गोल्ड, बिल्डर, इक्सपोर्ट, इंपोर्ट, दारु ते चड्डीपर्यंतचा व्यवसाय करण्याचं स्टार्टअप सुरु केलं होतं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे विनंती आहे की, त्यांचंही नाव रेकॉर्ड करावं”, असं मोहित कंबोज ट्विटमध्ये म्हणाले.
इसी शुगर फ़ैक्टरी ने फिर 150 crore का लोन ले लिया।
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
HDIL - PMC Bank - Patra Wala Chawl की कितनी शक्कर खायी है गबरू जवान ने यह भी जल्द पता चले गा !
ग़ज़ब का business model है भाई इस गबरू जवान का !
“गबरु जवानच्या या बिझनेस मॉडेलचा महाराष्ट्र बँकेला 2007 ते 2012 दरम्यान 1000 कोटींचं नुकसान झालं आहे. याच बँकेने एका साखर कारखान्याला कोट्यवधींचं कर्ज दिलं. या साखर कारखान्यात पैसे दाबले गेल्यानंतर 2012 मध्ये या कारखान्याचं ऑक्शन केलं गेलं आणि गबरु जवानाच्या बारामती अॅग्रो कंपनीने कार्टेल बनवून 500 कोटीत कारखान्याला विकत घेतलं. त्यानंतर याच साखर कारखान्याने पुन्हा दीडशे कोटींचं कर्ज घेतलं. HDIL - PMC Bank - Patra Wala Chawl मधील किती साखर या गबरु जवानाने खाल्ली आहे त्याबाबत लवकरच माहिती मिळेल. पण या गबरु जवानाचा बिझनेस मॉडेल गजबच आहे”, अशी उपरोधिक टीका कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.