Home /News /national /

राज्यसभेसाठी आता मुख्यमंत्री मैदानात, राज यांच्या पुण्यातील सभेवर प्रश्नचिन्ह, पुढील 3-4 दिवसांत राज्यात पाऊस TOP बातम्या

राज्यसभेसाठी आता मुख्यमंत्री मैदानात, राज यांच्या पुण्यातील सभेवर प्रश्नचिन्ह, पुढील 3-4 दिवसांत राज्यात पाऊस TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 18 मे : राज्यसभेसाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी पुढाकार घेतला आहे. सहावी जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. ओबीसी आरक्षणासाठी मध्य प्रदेशप्रमाणे राज्य सरकारने इम्पिरिकल डाटा जून महिन्यात सादर करण्याची तयारी केली आहे. केतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता पुढील 3-4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची बरसात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एंट्री राज्यसभा निवडणुकीवरून (rajya sabha election 2022) राज्यात आता राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेनेनं दुसरी जागा लढवणार अशी घोषणा केली आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी पुढाकार घेतला आहे. सहावी जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांना बैठकीला बोलावली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. OBC Reservation साठी राज्य सरकारला आली जाग ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून  सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मध्य प्रदेश सरकारला (Madhya Pradesh) दिलासा दिल्यामुळे निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे. आता याच धर्तीवर राज्य सरकारने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्य सरकारकडून इम्पिरिकल डाटा जून महिन्यात सादर करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राज्यात ओबीसींसह निवडणुका होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) सध्या पुण्याच्या दौऱ्यावर (Raj Thackeray Pune tour) आहेत. पुढील आठवड्यात 21 मे रोजी सभा होणार आहे. पण, पावसाच्या शक्यतेमुळे सभा कधी घ्यावी (Raj Thackeray Rally in Pune) असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे मनसेकडून गुरुवारी दुपारी 12 वाजता सभेबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. केतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी घेतले ताब्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिने वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती. या प्रकरणात आतापर्यंत केतकीसह आणखी दोघांना अटक झाली आहे. तर केतकीची पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणाला अखेर पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. जितेंद्र आव्हाडांच्या घोषणेवर पुन्हा एकदा शिवसेना नाराज राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या घोषणेवरून पुन्हा एकदा शिवसेना नाराज झाल्याचे चित्र आहे. वरळीतील बीडीडी चाळमध्ये (worli bdd chawl police quarters)  पोलिसांसाठी घरं देण्याची घोषणा करण्यात आली असून यासाठी 50 लाख रुपये मोजावे लागणार आहे, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. पण, हा मतदारसंघ शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) यांचा असल्यामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. नालासफाई पाहणी दौरा भाजप आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे , पक्षनेते विनोद मिश्रा, भालचंद्र शिरसाट प्रवक्ते महाराष्ट्र भाजपा व भाजपा नगरसेवक हे नालासफाई पाहणी करणार आहेत. पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता अपेक्षेप्रमाणे यंदा भारतामध्ये मान्सूनचं (Monsoon in India) आगमन वेळेआधीच झालं आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे आता येथे नागरिकांना, शेतकर्‍यांना पावसाचे वेध लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता पुढील 3-4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची बरसात होणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या', थेट पंतप्रधान मोदींना पत्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) जून महिन्यात अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, आधी उत्तर भारतीयांची माफी मागा मगच अयोध्यात या अशी ठाम भूमिका भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (bjp mp brij bhushan sharan singh) यांनी घेतली आहे. आता बृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी  गुरू माँ कांचन गिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Monsoon, Raj thackarey, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या