मराठी बातम्या /बातम्या /पुणे /राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे...

मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे...

मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे...

पुणे, 18 मे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) सध्या पुण्याच्या दौऱ्यावर (Raj Thackeray Pune tour) आहेत. पुढील आठवड्यात 21 मे रोजी सभा होणार आहे. पण, पावसाच्या शक्यतेमुळे सभा कधी घ्यावी (Raj Thackeray Rally in Pune) असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे मनसेकडून गुरुवारी दुपारी 12 वाजता सभेबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले  आहे. मात्र, दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. ही सभा रद्द करावी लागणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता सभेसाठी दोन जागेची चाचपणी सुरू आहे. या दोन्ही जागेबद्दल परवानगी सुद्धा मिळालेली आहे, गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सभा कुठे होणार आणि कधी होणार याबद्दल घोषणा केली जाईल, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली. राज ठाकरे यांची नदीपात्रात सभा होण्याऐवजी पावसामुळे सभागृहामध्ये सभा घेण्याचं नियोजन सुरू  आहे. गणेश कला क्रीडा रंगमंदिरात सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(केतकी चितळेला जामीन नाहीच! कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; आजचा मुक्काम जेलमध्येच)

दरम्यान, पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांना भेटण्यासाठी राज ठाकरे यांनी वेळ दिला होता. पण ही भेट झालीच नाही. राज ठाकरे वसंत मोरे यांना न भेटताच मुंबईला रवाना झाले आहे. खुब्याच दुखणं वाढल्याने राज ठाकरे उद्या ऐवजी आजच मुंबईला रवाना झाले आहे. वसंत मोरे यांना सकाळी भेटायला बोलावलं होतं, मात्र तब्येत बरी नसल्याने राज ठाकरे मुंबईला रवाना झाल्याने भेट टळली.

राज ठाकरेंनी खरेदी केली 50 हजारांची पुस्तकं

दरम्यान,  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मंगळवारी (17 मे 2022) राज ठाकरेंनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला (akshardhara book gallery) भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी तेथे रात्री उशीरापर्यंत जवळपास दीड तास पुस्तक खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी जवळपास 50 हजार रुपयांची पुस्तके पुण्यातून खरेदी केली आहेत.

(अरे हे काय? प्रियांका चोप्राच्या नाकातून रक्त, ओठही फुटले)

या संदर्भात अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुक गॅलरीला भेट दिली. जवळपास त्यांनी दीड तास पुस्तके पाहिली. प्रामुख्याने त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक विषयाची पुस्तके, कला, आत्मचरित्र अशी जवळपास 50 हजार रुपयांची पुस्तके त्यांनी खरेदी केली आहेत. राज ठाकरे यांच्याकडे यापूर्वी पुस्तके होती पण त्यांची काही पुस्तके कुणालातरी देण्यात आली. त्यानंतर अशी पुस्तके त्यांनी पुन्हा खरेदी केली. मृत्यूंजयची डिलक्स आवृत्ती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती इंग्रजी पुस्तक खरेदी केलं असंही रमेश राठिवडेकर यांनी सांगितले

First published: