Home /News /national /

'ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या', थेट पंतप्रधान मोदींना पत्र

'ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या', थेट पंतप्रधान मोदींना पत्र

'ब्रृजभूषण यांना राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी कोणताही अधिकार नाही. ते एका भक्ताला प्रभू श्रीरामाच्या दर्शनापासून दूर ठेवत आहे. अयोध्येची भूमी पवित्र आहे'

'ब्रृजभूषण यांना राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी कोणताही अधिकार नाही. ते एका भक्ताला प्रभू श्रीरामाच्या दर्शनापासून दूर ठेवत आहे. अयोध्येची भूमी पवित्र आहे'

'ब्रृजभूषण यांना राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी कोणताही अधिकार नाही. ते एका भक्ताला प्रभू श्रीरामाच्या दर्शनापासून दूर ठेवत आहे. अयोध्येची भूमी पवित्र आहे'

    नवी दिल्ली, 18 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) जून महिन्यात अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, आधी उत्तर भारतीयांची माफी मागा मगच अयोध्यात या अशी ठाम भूमिका भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (bjp mp brij bhushan sharan singh) यांनी घेतली आहे. आता बृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी  गुरू माँ कांचन गिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्याला जाणार आहे. पण, भाजपचे खासदार विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केल्यामुळे वाद पेटला आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी गुरू माँ कांचन गिरी यांनी धाव घेतली आहे. गुरू माँ कांचन गिरी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांना अयोध्याला येण्यासाठी मी स्वत: निमंत्रण दिले आहे. ब्रृजभूषण यांना राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी कोणताही अधिकार नाही. ते एका भक्ताला प्रभू श्रीरामाच्या दर्शनापासून दूर ठेवत आहे. अयोध्येची भूमी पवित्र आहे, ती सर्वांसाठी एकसमान आहे. मग ती कोणतीही व्यक्ती असो, अशी भूमिका गुरू माँ कांचन गिरी यांनी पत्रातून पंतप्रधान मोदींकडे मांडली. (स्पर्धा परीक्षा कुठलीही असो GK चं टेन्शन घेऊ नका; असं वाढवा General Knowledge) जेव्हा आपण सर्व हिंदूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, तेव्हा ब्रृजभूषण यांना कुणालाही रोखण्यासाठी अधिकार कुणी दिला? ही भेट फक्त एका भक्त आणि श्रीरामाची नाही तर हिंदुत्व एकजूट करण्यासाठी आहे. त्यामुळे ब्रृजभूषण यांना रोखावे अन्यथा त्यांना साधू समाजाच्या शक्तींचा सामना करावे लागेल, असा इशाराही गुरू माँ कांचन गिरी यांनी दिला आहे. तसंच, जर कुणामध्ये परिवर्तन झाले असेल तर त्याला आपण एक संधी दिली पाहिजे, आज पण अनेक उत्तर भारतीय महाराष्ट्रात शांतपणे राहत आहे. त्यामुळे बृजभूषण यांना समजवण्याची गरज आहे, आपण यात लक्ष द्याल, अशी विनंतीच त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. (निसर्गरम्य वातावरणातली ही Valley of Flowers पाहिलीत का? सुंदर PHOTOS) दरम्यान, राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली. महाराष्ट्रात आता राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही, असेही बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि त्यानंतर अचानक राम भक्त बनायचे, हे जनतेच्याही लक्षात येत आहे, या शब्दात खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या