Home /News /maharashtra /

केतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी घेतले ताब्यात, NCP च्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं

केतकीची FB पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी घेतले ताब्यात, NCP च्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं

किरण इनामदारला पोलीस स्टेशनला घेऊन आले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला.

किरण इनामदारला पोलीस स्टेशनला घेऊन आले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला.

किरण इनामदारला पोलीस स्टेशनला घेऊन आले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला.

    प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 18 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिने वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती. या प्रकरणात आतापर्यंत केतकीसह आणखी दोघांना अटक झाली आहे. तर केतकीची पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणाला अखेर पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केतकी चितळेने शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक फेसबुक पोस्ट केली होती. हीच पोस्ट किरण इनामदार तरुणाने  शेअर केली होती. या प्रकरणी किरण इनामदार याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तरुण मागील पाच दिवसांपासून फरार होता. अखेरीस आज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (स्पर्धा परीक्षा कुठलीही असो GK चं टेन्शन घेऊ नका; असं वाढवा General Knowledge) किरण इनामदारला पोलीस स्टेशनला घेऊन आले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला. साडी,बांगड्या घेऊन राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या पोलीस स्टेशन बाहेर जमा झाल्या होत्या.  या तरुणाच्या विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी कडक बंदोबस्त केला. केतकी चितळेला जामीन नाहीच! दरम्यान,  केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीच्या जामीन अर्जाचा निर्णय राखीव ठेवला आहे. जामीन अर्जावर सुनावणी अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे  केतकीला आता ठाण्यातील कारागृहात हलवण्यात आले आहे. केतकी चितळेवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली होती. ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर दाखल गुन्ह्यांत आणखी एक कलम वाढवले आहे. आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने केतकी चितळे हिची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली.   या प्रकरणात जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निर्णय राखीव ठेवला आहे.  आज जामीन अर्जावर सुनावणी अपूर्ण राहिली. तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांच्या अभिप्रायासाठी निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे.  पुढील सुनावणी तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांच्या अभिप्रायानंतर होणार आहे. गुरुवारी सकाळी केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना देण्यात येणार आहे. (निसर्गरम्य वातावरणातली ही Valley of Flowers पाहिलीत का? सुंदर PHOTOS) दरम्यान, आज केतकीचा वैद्यकीय चाचणी जे जे हॅास्पिटल मध्ये करण्यात आली. तिला फीट येण्याची तक्रार होती. गोरेगाव पोलिसांनी ताबा न घेतल्यामुळे केतकीचा आजचा मुक्काम ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये असणार आहे. केतकीला 'तो' मेसेज कुणी पाठवला, ती व्यक्ती कोण? दरम्यान,  केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल सायबर सेलच्या मदतीने तपास केला जात आहे. पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.  केतकीने मोबाईलमधील मेसेज डिलीट केले असण्याची शक्यता आहे.  यासाठी तिचा मोबाईल फॅारेन्सिक चाचणीकरता पाठवणार आहे. तसंच तिने फेसबुकवर केलेली पोस्ट ही २०२० ची पोस्ट तीने आता का केली याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे,  केतकी व्हॉटसअॅप वापरत नव्हती मात्र ती सोशल मीडिया सॅव्ही आहे. त्यामुळे ती इतरांशी संपर्कात राहण्यासाठी कशाचा वापर करत होती याचा पोलीस तपास करणार आहे. कारण पोलिसांना संशय आहे की, केतकीला कोणा एका व्यक्तीनं अथवा ग्रुपने ती पोस्ट दिली आहे असा संशय आहे. त्याचा तपास पोलीस करत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या