Home /News /mumbai /

Maharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon

Maharashtra Weather Forecast: पुढील 3-4 दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता; या तारखेला येणार Monsoon

पावसाने महाराष्ट्राकडे (Monsoon in Maharashtra) कूच केलेली असल्यामुळे काही भागात तरी लोकांना दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21 मे पर्यंत आता दक्षिण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 मे : भारतामध्ये यंदा उन्हाच्या तीव्रतेने अनेक विक्रम मोडले आहेत आणि नवे तयार केले आहेत. भयंकर उष्णतेने जीवाची काहिली होत असल्यानं लोक हैराण झाले आहेत. मात्र, राज्यातल्या अनेक भागांसाठी खुशखबर आहे. लवकरच या उन्हाच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे यंदा भारतामध्ये मान्सूनचं (Monsoon in India) आगमन वेळेआधीच झालं आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे आता येथे नागरिकांना, शेतकर्‍यांना पावसाचे वेध लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता पुढील 3-4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची बरसात होणार आहे. पावसाने महाराष्ट्राकडे (Monsoon in Maharashtra) कूच केलेली असल्यामुळे काही भागात तरी लोकांना दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21 मे पर्यंत आता दक्षिण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट यंदा 19 मे रोजी मध्य महाराष्ट्रातील (Rain Yellow Alert in Maharashtra) सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पराभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात उष्णतेची लाट कायम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस बरसण्याची शक्यता असली तरीही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. 21 मे ला नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ या भागात उष्णतेची लाट तशीच राहण्याची शक्यता आहे. हे वाचा - Bengaluru : अतिवृष्टीनंतर रस्ते बनले तलाव, 2 कामगारांचा मृत्यू, IMDचा ऑरेंज अलर्ट PHOTOS मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन अंदमानात 48 तासांपूर्वीच झालं आहे. आता केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून दाखल होईल. मान्सूनचा प्रवास असाच सुरळित राहिला तर मुंबईतही 6 जूनला पावसाच्या सरी बरसतील, (Mumbai Rain Update) असं वेधशाळेनं म्हटलंय. हे वाचा - Monsoon in Mumbai: Good News! मुंबईत यंदा मान्सून लवकरच येणार मुक्कामी; ही असेल 2 जून पर्यंत मान्सून कोकणात हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून तळकोकणात 2 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि कोकणच्या समुद्रकिनारपट्टीवर सध्या फेसाळत्या लाटा उसळत आहेत. त्या किनाऱ्यावर धडकू लागल्या आहेत. ही परिस्थिती म्हणजे मान्सूनची चाहूल असते. यंदा राज्यात 6 जून पर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा भारतामध्ये पाऊस सामान्य राहणार असल्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Heat, Mumbai rain, Rain, Vidarbha, Weather forecast, Weather update

    पुढील बातम्या