मुंबई, 18 मे : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या घोषणेवरून पुन्हा एकदा शिवसेना नाराज झाल्याचे चित्र आहे. वरळीतील बीडीडी चाळमध्ये (worli bdd chawl police quarters) पोलिसांसाठी घरं देण्याची घोषणा करण्यात आली असून यासाठी 50 लाख रुपये मोजावे लागणार आहे, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. पण, हा मतदारसंघ शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) यांचा असल्यामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली. या बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्समध्ये राहत असलेल्या पोलिसांना ५० लाख रूपयांना घरे दिली जातील. २२५० पोलीस कुटुंबीय तिथं राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. ( राज्यसभेसाठी संभाजीराजेंसमोर शिवसेनेचाच पर्याय? सेना खासदारचे सूचक विधान ) पण पोलिसांच्या घरांच्या किंमतींवरून राज्य सरकारमध्ये मतभेद पाहण्यास मिळत आहे. घरांसाठी आकारण्यात आलेल्या 50 लाखांच्या किंमतीवरून शिवसेनेत नाराजी पसरली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात जास्तीत जास्त बीडीडी चाळ येते. ५० लाख किंमतीने पोलीस कुटुंबीयही नाराज झाले आहे. या सर्व नाराजीचा फटका वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण विभागाच्या या निर्णयानं शिवसेनेत नाराजीचा सूर आहे. काय केली आव्हाडांनी घोषणा? वरळी बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्समध्ये राहत असलेल्या पोलिसांना ५० लाख रूपयांना घरे दिली जातील. २२५० पोलीस कुटुंबीय तिथं राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे. या बीडीडी चाळीत पोलिसांना ५०० चौरस फुटांची घरे दिली जातील. ज्याचा वरळीत बांधकाम खर्च १ कोटी ५ लाख इतका आहे. त्यामुळे फुकटात अजिबात घरे दिली जाणार नाहीत. गिरणी कामगार आणि पोलीस यांची तुलना होऊ शकत नाही, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. ( पुणे : पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून… ) ‘मुळात ती पोलीस क्वाटर्स आहेत. त्यांचा यावर काहीही हक्क नाही. असं प्रत्येक ठिकाणी झाले तर पोलिसांना मुंबईत राहण्यासाठी क्वार्टर्स मिळणार नाहीत. हा धोरणात्मक निर्णय नाही, वरळीपुरता हा निर्णय आहे. फुकटात घर देणार नाही. त्यांचा मालकी हक्क नाही, सरकारने मोठ्या मनाने घरं देतंय. ५० लाख किंमत द्यावीच लागणार आहे, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.