मुंबई, 30 जून : राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. पण, या नाट्यात शेवटपर्यंत धक्क्यावर धक्के पाहायला मिळाले. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. यानंतरही अनेक प्रश्न आणखी अनुत्तरीत आहेत. येत्या काळात त्यांचीही उत्तरे मिळतील. राज्यपालांनी मुख्यमंत्री शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सत्ता गेल्यानंतर पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. दुसरीकडे अद्याप राज्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा.
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला कसे तयार झाले, Inside Story
सत्तेत सहभागी न होण्याच्या फडणवीसांच्या या घोषणेनंतर काही तासांमध्येच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. यानंतर अमित शाह यांनीही फडणवीस या जबाबदारीसाठी तयार झाले असल्याची माहिती ट्वीटरवर दिली.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांचा विषय
नव्या सरकारचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. विशेष म्हणजे पहिल्याच मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या विषयांवर चर्चा झाली.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यपालांनी नव्या सरकारने बहुमत सिद्ध करा, असे आदेश दिले आहेत.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
'देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, हा तर आश्चर्याचा धक्का', शरद पवारांनी डिवचलं
देवेंद्र फडणवीस राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी अडीच वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. तरीही त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला की त्यामध्ये तडजोड नाही, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
महाराष्ट्रात सत्ता बदलताच शरद पवारांना धक्का, आयकर विभागाची नोटीस
महाराष्ट्रामध्ये हा शपथविधी झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
राज्यात पावसाने (Maharashtra monsoon update) म्हणावा तसा जोर धरलेला नाही, कोकण (Konkan rain update), मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान धरणांच्या (dam area rain) पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पावसाने दडी मारलेल्या भागात दुबार पेरणीचे (second time sowing crisis) संकट आले आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.