Home /News /mumbai /

BREAKING : राज्यपालांचे नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

BREAKING : राज्यपालांचे नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

    मुंबई, 30 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचं आणि भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नव्या सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. नव्या सरकारने बहुमत सिद्ध करा, असे आदेश दिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी येत्या शनिवारी म्हणजेच 2 जुलैला विशेष अधिवशेन भरवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विधासभा अध्यक्षांचीदेखील निवड होणार असल्याची माहिती सूत्रांना दिली. दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते. "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालं आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखीन. मी भारताची सार्वभौमत्व आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्यायाची वागणूक देईन", अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पहिली कॅबिनेट बैठक संपन्न  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना भावनिक साद घातली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव आणि वरिष्ठाधिकारी यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलता देणे आणि निर्णय क्षमता येणे महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करूया"
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या