मुंबई, 30 जून : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह असलेल्या 39 शिवसेना आमदार आणि 11 अपक्षांनी बंड केलं, ज्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, पण भाजपने राजकीय बॉम्ब फोडला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हेच सांगताना फडणवीसांनी आपण मात्र या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं सांगितलं. सत्तेत सहभागी न होण्याच्या फडणवीसांच्या या घोषणेनंतर काही तासांमध्येच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. यानंतर अमित शाह यांनीही फडणवीस या जबाबदारीसाठी तयार झाले असल्याची माहिती ट्वीटरवर दिली.
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना दोन वेळा फोन केले, यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी @Dev_Fadnavis यांचे अभिनंदन करतो. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांचा अनुभव आणि विद्वत्ता ही सरकारसाठी मोठी संपदा आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेला ते अधिक बळकटी देतील याची मला खात्री आहे.
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2022
काय म्हणाले फडणवीस? एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
प्रामाणिक कार्यकर्ता के नाते पार्टी के आदेश का मैं पालन करता हूँ. जिस पार्टी ने मुझे सर्वोच्च पद तक पहुँचाया, उसका आदेश मेरे लिए सर्वोपरि है.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 30, 2022
एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे. https://t.co/uBp4yBsU5D
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगाम, पीक पाणी, पीक विमा तसंच कोबी बाबतची परिस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला 2 जुलैला विशेष अधिवेशन बोलवून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या अधिवेशनात विधासभा अध्यक्षांचीदेखील निवड होणार असल्याची माहिती सूत्रांना दिली.