Home /News /agriculture /

Monsoon update : मान्सून आहे कुठे? पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Monsoon update : मान्सून आहे कुठे? पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पावसाने दडी मारलेल्या भागात दुबार पेरणीचे (second time sowing crisis) संकट आले आहे. ज्या भागात सुरूवातीला पाऊस झाला त्या भागात घाईने शेतकऱ्यांनी (farmer) पेरण्या केल्या होत्या

  मुंबई, 30 जून : राज्यात पावसाने (Maharashtra monsoon update) म्हणावा तसा जोर धरलेला नाही, कोकण (Konkan rain update), मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान धरणांच्या (dam area rain) पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पावसाने दडी मारलेल्या भागात दुबार पेरणीचे (second time sowing crisis) संकट आले आहे. ज्या भागात सुरूवातीला पाऊस झाला त्या भागात घाईने शेतकऱ्यांनी (farmer) पेरण्या केल्या परंतु पाऊस थांबल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सगळ्यानाच पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

  कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. सिंधूदुर्ग, रायगड, जळगाव, पुणे, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर घाटमाथ्यावरही पावसाचा काहीसा जोर दिसून आला. उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामान, उन्हाचा चटका, हलक्या सरी असेच चित्र पाहायला मिळत आहे.

  हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?

  दरम्यान मागच्या 24 तासांत कोकणातील कुडाळ 60, रायगड, पेण येथे 50, दोडामार्ग, वसई, म्हसळा, कल्याण, माथेरान प्रत्येकी 40, डहाणू, पालघर, विक्रमगड, सुधागड, मुलदे, मालवण, मेखेडा, मंडणगड, वेंगुर्ला येथे प्रत्येकी 65

  मध्य महाराष्ट्र : धरणगाव 50, लोणावळा 40, नगर, गगनबावडा, एरंडोल प्रत्येकी 30, इगतपुरी, जेऊर, वडगाव मावळ, राधानगरी प्रत्येकी 20.

  मराठवाडा : परभणी 40, परांडा, भूम, खुलताबाद प्रत्येकी 30, देवणी, पूर्णा प्रत्येकी 20.

  घाटमाथा : कोयना (नवजा)70, अंबोली 50, लोणावळा 40, डुंगुरवाडी, ताम्हिणी, भिरा, धारावी प्रत्येकी 30 मिलीमीटर पाऊस झाला.

  हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य यादी

  उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात मॉन्सूनची प्रगती

  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) उत्तर भारतात प्रगती केली आहे. बुधवारी (ता. २९) संपूर्ण, बिहार, उत्तराखंडसह, हिमाचल प्रदेशचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उद्यापर्यंत (ता. 1) संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्लीसह, राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाना, चंडीगडच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  जोरदार पावसाचा इशारा

  ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जोरदार पावसाचा इशारा

  यलो अलर्ट असलेले जिल्हे : कोकण : रायगड, ठाणे, मुंबई. • विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

  विजांसह पावसाचा इशारा : मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली. विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Todays weather, Weather forecast, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या