Home /News /national /

ठाकरे सरकारचा आज होणार फैसला? राष्ट्रपतीपदासाठी 'या' नेत्यांमध्ये सामना TOP बातम्या

ठाकरे सरकारचा आज होणार फैसला? राष्ट्रपतीपदासाठी 'या' नेत्यांमध्ये सामना TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात मोठी घटना घडली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. परिणामी राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये ठाकरे सरकारचं भविष्य समजणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंडखोरी नाट्य रंगलं असताना तिकडे दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी भाजपने उमेदवार घोषित केला आहे. देश विदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. उद्धव ठाकरे आज 1 वाजता घेणार मोठा निर्णय? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले, तसंच आज दुपारी 1 वाजता तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांचा एल्गार शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडाली आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी सध्याच्या या घडामोडींवर 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली आहे. 'शिवसेना पुन्हा संघर्षाने उभी करु', असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. बंडखोर आमदारांना मध्यरात्रीतूनच एअरलिफ्ट करणार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्याशिवाय काही आमदारांना मारहाण करणे किंवा त्यांचं अपहरण केल्याचाही आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बंडखोरी करून सुरतला गेलेल्या आमदारांना एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'भाजपसोबत कसं जायचं?', मुख्यमंत्र्यांचा शिवसेना आमदार-खासदारांना सवाल आपण एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. ते ऐकतील, असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घ्या, अशी विनंती केली आहे. पण भाजपसोबत कसं जायचं? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांसमोर उपस्थित केला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. एकनाथ शिंदेंचा फोनवर ठाकरेंना भावनिक सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांकडून विरोधात घोषणाबाजी केली जात असल्याने शिंदे भावूक झाले. साहेब, मी 24 तास इतका वाईट झालो का? असा भावनिक सवाल शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना केला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रात राजकीय भूकंप, काँग्रेस अलर्ट एकीकडे शिवसेनेमध्ये बंड झालेलं असतानाच आता काँग्रेसही अलर्ट मोडवर आली आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाविकासआघाडीच्या घटकपक्षांसोबत कमलनाथ हे चर्चा करणार आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले जाईल का? शरद पवारांनी दिले स्पष्ट उत्तर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 29 आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. पण त्यांना मुख्यमंत्रिपद द्यावं की नाही द्यावं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यातून कोणता कोणता तरी मार्ग निघणार आहे, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाजपकडून एकाच दगडात दोन पक्षी? द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंडखोरी नाट्य रंगलं असताना तिकडे दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी भाजपने उमेदवार घोषित केला आहे. याआधी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह 13 विरोधी पक्षांनी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (yashwant sinha) यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Elections) विरोधी उमेदवार म्हणून नाव देण्यास सहमती दर्शवली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. विरोधकांकडून यशवंत सिन्हा उमेदवार काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह 13 विरोधी पक्षांनी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (yashwant sinha) यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Elections) विरोधी उमेदवार म्हणून नाव देण्यास सहमती दर्शवली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Top news maharashtra

    पुढील बातम्या